Bacchu Kadu On Cm Devendra Fadanvis : राज्यात अर्ध्याहून जास्त मंत्री आका, देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) मोठा आका आहेत अशी कडवी टीका प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केलीयं. दरम्यान, पीकविम्याच्या प्रश्नावरुन प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू चांगलेच संतापले आहेत. यासोबतच शक्तीपीठ महामार्गावरुनही माजी आमदार बच्चू कडू यांनी कडाडून टीका केलीयं. शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेच्या निमित्ताने वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे कडू आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Maharashtra Rain : पुढील दोन दिवस महत्वाचे, आभाळात ढगांची गर्दी; ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळणार
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, पीकविमा कंपन्या फसव्या आहेत. त्यामुळेच देशात भ्रष्टाचार होत आहे. या कंपन्या गुजरातमध्ये फिरकत पण नाहीत. राज्यात अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री आका आहेत. ते फक्त पैसे कमवण्यासाठीच मंत्रिपद घेतात, दुसरं काहीही नाही. देवेंद्र फडणवीस हे सर्वांचे मोठे आका आहेत, अशी टीका बच्चू कडू यांनी केलीयं.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना गुडन्यूज! वयोमर्यादा ओलांडली तरी संधी मिळणार
वेळप्रसंगी गोळ्या झेलण्याची तयारी…
पवनार ते पत्रादेवी या सुमारे 802 किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गाची मागणी कुणीही केली नव्हती. शेतकऱ्यांचीही मागणी नव्हती. तरीदेखील हा महामार्ग मंजूर करण्यात आला. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. या महामार्गाला आमचा विरोध आहे. सरकारने महामार्गाचे काम सुरू करू नये. जर काम सुरू केले तर काम बंद करून वेळप्रसंगी गोळ्या झेलण्याची आमची तयारी आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
शेतकऱ्यांना मदत जाहीर करा…
राज्यातील शेतकऱ्यांना काहीही कमी पडणार नाही असे सरकार सांगते. पण खरंतर नुकसानीचे पंचनामेच केले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मग मदत तरी कशी मिळणार. पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी. कर्जमाफी देखील जाहीर करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली. सरकारकडून शेतमालासाठी हमीभाव जाहीर केला जातो पण दुसरीकडे 3400 रुपयांनी सोयाबीन विक्री करावी लागत असेल तर त्या हमीभावाचा अर्थ काय असा सवाल माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.