Maharashtra Rain : पुढील दोन दिवस महत्वाचे, आभाळात ढगांची गर्दी; ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रविवार आणि सोमवारी मुंबईत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. आजही काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढील तीन ते चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटास पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रविवार आणि सोमवारी मुंबईत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये आज तर रत्नागिरी, रायगडमध्ये सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात (Maharashtra Rain Alert) पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. काल मुंबईसह काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. अहिल्यानगर शहरात शनिवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. आज पाऊस थांबला असला तरी ढगाळ हवामान कायम आहे. राज्यात अन्य ठिकाणीही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्याला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
कोकण, मराठवाडा अन् विदर्भात जोरधार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज
‘या’ भागात पावसाचा अंदाज
राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. यावेळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावे असा इशारा हवामान विभागाने (IMD Rain Alert) दिला आहे.
प्रशासनाच्या नागरिकांना सूचना
नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.
पावसाचा मुक्काम कायम! आज मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत कोसळधार; हवामान विभागाचा अलर्ट