मोठी बातमी! व्यापाऱ्यांनी दुकानं का बंद ठेवली होती?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा

  • Written By: Published:
मोठी बातमी! व्यापाऱ्यांनी दुकानं का बंद ठेवली होती?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा

CM Fadnavis on Jarange Movement : मुंबईत आझाद मैदानात मनोज जरांगे (Jarange) यांचं आंदोलन सुरू असताना पहिले दोन दिवस त्या परिसरातील दुकानं बंद ठेवण्यात आली. आंदोलकांना अन्न आणि पाणी मिळू नये असा त्यामागे उद्देश होता असा आरोप त्यावर करण्यात आला. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

पहिल्या दिवशी काही लोकांना त्या ठिकाणी धुडगूस घातला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली असं मुख्यमंत्री म्हणाले. आता दुकाने उघडी आहेत आणि राहतील असंही ते म्हणाले. त्याचबरोबर आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करण्यात आला. कुणीही त्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले नव्हते. काही लोकांनी धुडगूस घातल्यानंतर व्यापाऱ्यांनी तसा निर्णय घेतला. नंतर आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही त्या ठिकाणी पोलीस फोर्स ठेवतोय. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानं उघडी ठेवली आणि आताही ती उघडी आहेत असं ते म्हणाले.

आंदोलनाच्या दरम्यान काही प्रकार झालेत ते नक्कीच भूषणावह नाहीत, पत्रकारांवरही हल्ले झालेत. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच, मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आझाद मैदान परिसरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. त्यामुळे आंदोलकांची मोठी हेळसांडही झाल्याचं दिसून आलं. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या