पवारांचा शेवटचा डाव तुम्हाला चितपट करेल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला इशारा

Jayant Patil : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील (NCP) फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार गटाची तोफ धडाडली. या सभेला संबोधित करतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार हाच आमचा पक्ष […]

पवारांचा शेवटचा डाव तुम्हाला चितपट करेल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला इशारा

Jayant Patil

Jayant Patil : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील (NCP) फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार गटाची तोफ धडाडली. या सभेला संबोधित करतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार हाच आमचा पक्ष आहे, त्यांना दिल्लीही दचकून असते, त्यांचा शेवटचा डाव तुम्हाला चितपट करेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.

रकुल प्रीत-जॅकी भगनानी अडकले विवाहबंधनात; पाहा फोटो 

या सभेला संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले की, आपल्यातले काहीजण सोडून गेले. जातांना त्यांनी पवार साहेबांचा पक्ष आणि निवडणूक चिन्ह पळवलं. मात्र, सुप्रिम कोर्टाने निवडणुक आयोगाला खडसावत आठ दिवसाच्या आत चिन्ह द्यायला सांगितलं. तर आता अजित पवार गट शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करा म्हणून हायकोर्टात गेलं. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांना अपात्र ठरवण्यासाठी मी याचिका दाखल केलीये. त्यामुळं राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीबाबत लय विषय उघडला तर सगळं टोकाला जाईल, असं इशाराही त्यांनी दिला.

कांदा निर्यातबंदी कायम! शेतकरी आक्रमक, बाजार समितीच्या आवारात निषेध आंदोलन ! 

पाटील पुढं म्हणाले, मुळात आमचा पक्ष शरद पवार साहेब आहेत. ते ज्या ठिकाणी उभे राहतील, त्या ठिकाणी पक्ष उभा राहिल. 2019 ला आपले वीस-पंचवीस आमदारही निवडून येणार नाहीत, असं बोलल्या जातं होतं, त्यावेळी पवास साहेब साताऱ्याच्या सभेत उभे राहिले आणि 54 आमदार निवडून आले. त्यामुळे तर दिल्लीलाही या नावाची भीती वाटते. त्यांचे डाव आम्ही पाहिले आहेत. ते काय करतील हे कोणी सांगू शकत नाही. मध्ये कोणीतरी तेल लावून पैलवान तयार होतो, त्याची काय अवस्था केली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. वस्ताद एक डाव मागे ठेवतात, त्यामुळं पवार साहेबांनी शेवटचा डाव मागे ठेवला आहे, जो त्या सर्वांना चितपट करेल, यात शंका नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

मावळच्या खासदाराने किती वेळा तोंड उघडले?
भारतीय लोकशाहीवर आघात व्हायला लागले, तेव्हा संसदेत अमोल कोल्हेंनी आवाज उठवला. त्यांनी आदिवासी, महिला, युवकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. मावळच्या खासदाराने किती वेळा तोंड उघडले? असा सवाल पाटील यांनी केला होता. आज कोल्हेंसारख्या निष्ठावान माणसांची गरज आहे. त्यामुळं आता मतदार म्हणून तुमची कसोटी आहे, त्यांनाच निवडून द्या…. कार्यकर्त्यांना आता कोल्हेंना निवडून देण्यासाठी कामाला लागा, बुथ कमिट्या स्थापन करा,अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या.

तर खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. छातांडावर झेलले, त्यातील सगळेच छत्रपतींच्या पोटी जन्माला आले नव्हते. त्यामुळं अनेकांना वाटतं की, पोटी जन्माला येणं गरजेचं आहे. अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्वाचं असतं. पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्याने बोट धरून चालवलं, त्याच्या सोबत चालणं गरजेचं असतं, असा टोला अजित पवारांना लगावला.

Exit mobile version