Mla Jayant Patil : साताऱ्यातील दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला गेलायं, त्यामुळे सातारकरांनो निवडणुकीत ताकद दाखवून द्या, अशी साद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातलीयं. सातारा विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अभयसिंग जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत मागील दिवसांत घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा दाखला देत जयंत पाटील यांनी मतदारांना साद घातलीयं. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबईकरांनो लक्ष द्या! BKC मध्ये दर शुक्रवारी कार, बाईकवर बंदी, मेट्रो-बसने प्रवासाचे आवाहन
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, राजकारणात बाळासाहेब देसाई यांचा वारसा शंभूराज देसाई पुढे चालवत आहेत. शंभूराज यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे राजकारण केलं तर निवडणुकीत चांगला निकाल लागेल. त्यांना विरोधात बोलणं शक्य नाही, ते सदस्यांना काही सांगूही शकत नाहीत. आता आपला नेता सांगू शकत नाही, हे सदस्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे. बाळासाहेब देसाईंसारखं धाडस शंभूराज देसाईंच्या पक्षातील सर्वांनीच दाखवावं. साताऱ्यातील दोन्ही मंत्र्यांच्या समर्थकांना जिल्हा परिषद निवडणुकीत घडलेल्या नाट्याबद्दल राग व्यक्त करण्याची ही शेवटची जागा आहे. त्यामुळे मतदारांनी अभयसिंह जगताप यांच्या मागे ठामपणे उभे राहून निवडणुकीत राग व्यक्त करावा, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
निखिल अन् अनुष्काच्या लग्नाची लगबग! जाधव, निंबाळकर कुटुंबीयांकडून खास केळवण
सातारा जिल्ह्यातील दोन्ही राजे सुवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांना न विचारताच उमेदवारी जाहीर झालीयं, त्यामुळे दोन्ही राजांचा स्वाभिमान दुखावला गेला असेल, असा माझा अंदाज आहे. दोन्ही राजांना फार काही विचारलं गेलं नाही. सुवेंद्रराजे यांचा उमेदवारासाएठी काही आग्रह होता, त्याची नोंदही घेतलेली नाही. उदयनराजेंचा तर असल्या गोष्टी खपवून घेण्याचा स्वभावच नाही. त्यामुळे सातारकरांनी निवडणुकीत स्वाभिमान दाखवावा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलंय.
तसेच आम्ही फक्त या मुद्द्यांवर मते मागत आहोत. आमची तशी काही मसल आणि मनी पावर वापरण्याची पद्धती नाही. तुम्ही कोणाशीही बोलू शकता, संपर्क करु शकता. आता माध्यम प्रतिनिधींनीच आमचे प्रचारक व्हा आणि साताऱ्याचा स्वाभिमान टिकवावा, असंही जयंत पाटील मिश्किलपणे म्हणाले आहेत.
