Jayant Patil : सत्तेसाठी काही पण ही भूमिका आपल्याला एकदा नाही दोनदा आपल्याला दिसली. विचारांशी फारकत लोक घेत आहेत. तर सत्तेसाठी काहीही करून नवा आदर्श काही लोक निर्माण करत आहेत. सामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्या ऐवजी सत्ताधारी पक्ष फोडण्यात मशगूल आहेत. अशी टीका जयंत पाटलांनी विरोधकांवर केली आहे. ते बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) स्वाभिमान सभेमध्ये बोलत होते.
आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे; पवारांचं वय काढणाऱ्या अजितदादांना सलगर भिडल्या
बीड शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आ. संदीप क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी जयंत पाटलांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शेरोशायरी करत धार्मिक दंगलींवर टीका आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडरांसह अनेक दिग्गज नेत्यांनी जनतेवर सूडाचं नाही तर प्रेमाचं राजकारण केलं. त्यामुळे त्यांना आजही लोक पूजतात. मात्र सत्तेसाठी काही पण ही भूमिका आपल्याला एकदा नाही दोनदा आपल्याला दिसली. विचारांची फारकत लोक घेत आहेत. तर तर सत्तेसाठी काहीही करून नवा आदर्श काही लोक निर्माण करत आहेत. नवाब मलिक आता तुरूंगातून बाहेर आले. ते आरोग्याच्या कारणाने त्यांना जामीन मिळाला. त्यांनी विश्रांती घ्यावी. असं आम्हाला वाटतं. दुसरं उदाहरण अनिल देशमुख यांचं आहे ते 14 महिने ते तुरूंगात होते. त्यांनी पवार साहेबांच्या मागे राहून एक आदर्श घालून दिला आहे.
जे लोक आशिर्वाद मागताहेत, तेच साहेबांविरुध्द कटकारस्थान करायचे; अनिल देशमुखांचे टीकास्त्र
पुढे जयंत पाटील म्हणाले की, देशातील परिस्थिती अशी आहे की, सीएजीच्या रिपोर्टमध्ये 7 मोठे घोटाळे पुढे आले आहेत. त्यात उत्तर प्रदेशामध्ये एका द्वारका एक्सप्रेस वे रस्ता निर्माण करण्यात आला. त्याचा प्रकल्प खर्च 14 पटींनी वाढवला आहे. तसेच आयुष्मान भारतमध्येही मृतांच्या नावे कोट्यावधी रूपये घेतले गेले. टोल नाक्यावरही तसंच 105 पैकी टोलवर 132 कोटी चुकीच्या पद्धतीने घेतले गेले. निराधारांचे पैसे जाहीरातींसाठी वापरले. हे सर्व कॅगचा अहवाल सांगतो. त्यामुळे मयताच्या टाळू वरचं लोणी कोण खातय? असा प्रश्न विचारायला हवा.
मणिपूर काही महिन्यांपासून धगधगतय महिलांवर अत्याचार होत आहेत. त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे जग भारताकडे आफ्रिकेकडे पाहतात तसं पाहतील की, काय? अशी भीती वाटत आहे. तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करायला हवं होतं. आर्मी गेली असती तर दोन दिवसात सगळ थांबलं असतं. केंद्र, महाराष्ट्र, मणिपूर आणि हरियाणा सगळीकडे डबल इंजिनचं सरकार असूनही जातीय दंगली उफाळून आल्या आहेत.
महाराष्ट्रात देखील हे दंगलीचे प्रयोग केले आहेत. तर राज्यात हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतात. मग राज्यात हिंदू धोक्यात का आहे? दुसरीकडे महागाईवर तर बोललंच जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला भाव, पाणीटंचाई यावर हे सरकार बोलत नाही. पण ते पक्ष फोडण्यात मशगूल आहेत. पवार साहेबांनी अनेक लढाया केल्या. कारण मानुस शरीराने म्हातारा होतो. शरीराने नाही. पवारांच्या भेटीवर वावड्या उठवल्या जातात मात्र भेटणं ही राज्याची संस्कृती आहे. तर पवार हे समोरचं म्हणणं ऐकतात. पण करायचं तेच करतात. त्यांची भूमिका कधी बदलता नाही. असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) स्वाभिमान सभेत त्यांनी विरोधकांवर टीका केली.