Download App

Jayant Patil : प्रसिद्धीशिवाय लोकांसमोर जाण्याचा चान्स राहिलेला नाही; जयंत पाटलांनी टाकला उलट फासा

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Jayant Patil : पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील (Jayant Patil) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. असं बोलल जात आहे. यावर आता स्वतः जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत जणू उलट फासाच टाकला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही. जर माझ्या नावाच्या अशा प्रकारे चर्चा होत असेल तर चांगला आहे सर्वांनीच प्रसिद्ध द्यावी. कारण थोडी प्रसिद्ध मिळाल्याशिवाय लोकांसमोर जाण्याचा चान्स राहिलेला नाही. असं म्हणत जयंत पाटील यांनी आपल्या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर जणू एक प्रकारे उलट फासाचं टाकला आहे.

‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् या वरळीत आमच्यासमोर’; शेलारांचं आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांवर ते आपल्या संपर्कात नसल्याचे सांगितलं मात्र यावेळी त्यांनी आमच्या सोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असल्याचे सुतोवाच देखील केलं.

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सांस्कृतिक कार्यक्रम, विखेंचा लंकेंना खोचक टोला

बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांच्या गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. ते कोणाच्या संपर्कात आहे? हे मला माहित नाही. परंतु माझ्या संपर्कात नाहीत. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी आमच्यासोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असून पक्षात भरपूर स्पेस आहे. कुणालाही नाही म्हणणार नाही. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतचही असेच आहे. असेही ते म्हणाले.

यावर खासदार सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, भाजपमध्ये मी स्वतः, रोहितसह अनेकजण जाणार याची चर्चा असते. पण भाजपकडे 200 आमदार 500 खासदार एवढा मोठा लवाजमा असतानाही भाजपला आमच्या लोकांची गरज लागते म्हणजे आमच्याकडे काहीतरी टॅलेंट नक्कीच आहे असे म्हणत सुळेंनी भाजपची अक्षरक्षः चिरफाड केली आहे.

follow us

वेब स्टोरीज