निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सांस्कृतिक कार्यक्रम, विखेंचा लंकेंना खोचक टोला

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सांस्कृतिक कार्यक्रम, विखेंचा लंकेंना खोचक टोला

Ahmednagar : येत्या काळात राज्यात लोकसभा (Lok Sabha Election)तसेच विधानसभा निवडणुका(Assembly elections) होणार आहेत. त्याअनुषंगाने नेतेमंडळींची धावपळ देखील सुरु झाली आहे. यातच आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke)यांनी खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe)हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे (shivputra sambhaji mahanatya)नगर शहरात आयोजन केले आहे. यावरुन विखे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, प्रत्येकाला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे. मी देखील असे कार्यक्रम घेतले आहेत. मात्र आमचा कोणताही कर्यक्रम घेण्याचा उद्देश हा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नसतो, अशी खोचक टीका यावेळी खासदार सुजय विखे (MP Sujay Vikhe)यांनी लंके यांचा नामोल्लेख टाळत केली.

गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा

विधानसभा निवडणूक अजून लांब आहे. त्याआधी लोकसभेची निवडणूक होणार आहे. आमदार निलेश लंके यांनी या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने सजलेले “शिवपुत्र संभाजी” या महानाट्याचे निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच मुंबई येथे पार पडललेल्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनातून लंके यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले व त्यांनतर नगरमध्ये “शिवपुत्र संभाजी” या महानाट्याचे आयोजन केले आहे. यामुळे लंके लोकसभेची तयारी यामाध्यमातून करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपसोबत युती करणार का? प्रश्न विचारताच राज म्हणाले माझा विषय वेगळाय….

यावेळी विखे म्हणाले की, प्रत्येकाला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे. मी देखील असे कार्यक्रम घेतले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील सांस्कृतिक मेळावा घेतला जातो आहे. विशष म्हणजे दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो, मात्र आमचा कोणताही उद्देश हा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यक्रम घेण्याचा नसतो. आज कोणी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला असेल तर दुसरं अजून कोणी दुसरीकडे कुठेतरी घ्यावा, इथे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आज महायुती खंबीर आहे. राज्यातील सरकार मुख्यमंत्री व उपुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेच्या कामांसाठी सज्ज आहे, असे देखील यावेळी विखे म्हणाले.

शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे लंके प्रतिष्ठानच्यावतीने 1 ते 4 मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता नगर शहरात आयोजन करण्यात आले आहे. हे ऐतिहासिक महानाट्य प्रथमच नगरकरांच्या भेटीला येत आहे. महानाट्यामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांची मैदानातून चित्तथरारक घोडेस्वारी पाहावयास मिळणार आहे. महानाट्यासाठी 150 फूट लांब, 80 फूट रुंद तसेच 5 मजली किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृतीचा 67 लाख रुपयांचा सेट लावण्यात येणार आहे. महानाट्यासाठी 20 लाख रुपयांची आकर्षक, राजेशाही ड्रेपरी, 4 लाख रुपयांची शस्त्रास्त्रे आणि युध्द साहित्य वापरण्यात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube