Jayant Patil Said Don’t Take My Guarantee In Farmer Protest : माझी गॅरंटी घेवू नका, माझं काही खरं नाही, असं खळबळजनक विधान राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जयंत पवार यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटलांच्या (Jayant Patil) पक्षांतराची चर्चा सुरू आहे. त्यात आता जयंत पाटलांचं हे विधान अतिशय महत्वाचं मानलं जातंय. आझाद मैदानात (Azad Maidan) शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनात ते सहभागी सुद्धा झालेत.
राजीव शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की, तो सोडलेला नाही. त्यामुळे राजीव शेट्टींच्या नेतृत्वाखाली, असं बोलत असताना जयंत पाटील म्हणाले की, माझी काही गॅरंटी घेवू नका. कारण माझं काही खरं नाही, तुमच्या मनात माझ्याबद्दल (NCP) शंका आहेत. तर सांगायचा मुद्दा काय की, ते जर आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण करता आलं असतं. ते झाले असते खासदार, पण ते आमचा सल्लाच ऐकत नाही, असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय.
पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे महाराष्ट्रातच; दुचाकीवरून फिरत असतानाचा सीसीटीव्ही समोर
आता जयंत पाटील यांच्या या विधानाने आता सगळ्यांच्या नजरा उंचावल्या आहेत. जयंत पाटील शरद पवारांना रामराम ठोकणार का, याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. काही दिवसांपासून जयंत पाटील हे (Maharashtra Politics) पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यानंतर आज जयंत पाटलांनी केलेलं विधान देखील राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरलेलं आहे.
भाजप आमदाराने भेसळयुक्त पनीरचा प्रश्न मांडला विधीमंडळात; बनावट अन् खरं पनीर कसं ओळखणार?
कोणतीही मागणी नसताना आणि 12 जिल्ह्यातील सुपीक जमिनीचा नाश होणार आहे, त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग अत्यंत वादग्रस्त ठरत चालला आहे. या महामार्गाविरोधात आज आझाद मैदानामध्ये (Farmer Protest At Azad Maidan) हजारो शेतकरी एकवटले आहेत.शक्तीपीठ महामार्ग विरोधात आता विधानसभेवरती देखील मोर्चा धडकणार आहे. या आंदोलनासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी एकवटल्याची माहिती मिळतेय. शक्तिपीठ महामार्ग विरोधात स्थगन प्रस्ताव देखील आणला जाणार आहे. तर आझाद मैदानात आज शेतकरी बांधवांना अंबादास दानवे, आमदार सतेज पाटील, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांनी संबोधित केलंय.
जयंत पाटील म्हणाले की, आम्ही आमच्या बाजूनं उभा राहा असं सांगत होतो. आता राजू शेट्टी यांनी मोर्चा आणला, तेव्हा त्यासंदर्भात बोलताना मी बोललो तुमचा माझ्यावर भरोसा नाही. तेव्हा मी बोललो माझं काही खरं नाही, तो रेफरन्स वेगळा होता. लोकसभेला ते वेगळे लढले, आम्ही वेगळे लढलो. यासंदर्भात बोलत असताना ते बोलले होते यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे तो रेफरन्स होता.
आम्ही बोलत होते आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, शेतकऱ्यांना देखील आम्ही सांगितलं की तुमचा नेता खंबीर आहे. शेट्टींना पाठिंबा, असं मी सांगत होते. भाषण करणं अवघडच झालं, माझं काही खरं नाही, असं मी का बोलेन.