Download App

‘काका-पुतण्याचं नातं कॉंग्रेसला धार्जीण, काहींना व्यक्तिगत संबंधही…’, जयंत पाटलांनी अजितदादांना सुनावलं

  • Written By: Last Updated:

Jayant Patil : महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाचा मोठा इतिहास आहे. मात्र कॉंग्रेसला काका-पुतण्याचं नातं धार्जिणं आहे, हे दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) आणि अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्याकडे पाहिल्यावर कळतं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेऊन अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने पवार कुटुंबात कटुता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देशमुख काका-पुतण्यांचे नाव घेत पवार काका-पुतण्यांमध्ये पडलेल्या संघर्षाच्या ठिणगीवर खंत व्यक्त केली.

पवारांसोबत असतांना विलासरावांचा फोन, जयंत पाटलांना सांगितला ‘तो’ किस्सा 

विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज लातुरमध्ये अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील हे विलासराव देशमुखांबद्दल भरभरून बोलले. यावेळी बोलताना पाटील यांनी समकालीन राजकारणावर भाष्य केले. राजकारणात विचार लोप पावत चालले असून बड्या नेत्यांची मुले आता शिव्याशाप देण्यापर्यंत पोचली आहेत, किती खालच्या थरावर जाऊन राजकारण होतंय, किती गुंडगिरी महाराष्ट्राती राजकारणात शिरत आहेत, याची अनेक उदाहरणं गेल्या काही महिन्यात दिसायला लागली आहेत, असा घणाघात जयंत पाटलांनी राणेंचं नाव न घेता केला.

Rohit Pawar : ‘शेतकऱ्यांचा नाही, बड्या व्यापाऱ्यांचाच फायदा’; रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 

ते म्हणाले, आता काळ खूप बदलला आहे. सत्ताधारी मंत्रिमंडळातील एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याला काहीही बोलू शकतो. सध्या एक आमदार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या मंत्र्याला काहीही बोलू शकतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या धोरणापेक्षा वेगळे धोरण मांडण्याची प्रथा सुरू झाली आहे. राज्याच्या राजकारणात शिस्त नसल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली.

आपण ज्या संस्कृतीत लहानाचे मोठे झालो ती टिकवण्याची जबाबदारी लातूरकरांची आहे. ती संस्कृती आता लोप पावू देऊ नये. आता लोप पावत चाललेली संस्कृती टिकवण्याचे काम लातूरकरांचे आहे. या बदलत्या राजकारणात संस्कृती टिकवण्याची गरज आहे. मी लातूरच्या जनतेला विनंती करतो की याच लातूरने महाराष्ट्रात काँग्रेसला सातत्याने ताकद आणि ऊर्जा दिली आहे. या लातूरने महाराष्ट्रात काँग्रेस भक्कमपणे उभी केली. आता महाराष्ट्रात अमित देशमुख हे नवे नेतृत्व म्हणून उदयास यावे, आपण एकत्र काम करू या, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबातील काका-पुतण्याच्या नात्यावरही भाष्य केले. जयंत पाटील म्हणाले की, ही चांगली गोष्ट आहे, काँग्रेसला काका-पुतण्याचे नातं धार्जीणं आहे. पण काही लोक आता व्यक्तिगत संबंधही तोडू लागले आहेत. पण, राजकारणात असं होता कामा नये, पण त्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत, असं म्हणत त्यांनी नाव न घेता अजित पवारांनाही टोला लगावला.

follow us