Download App

Maharashtra Bhushan Award ceremony : खरे सांगा, मृत्यू उष्मघाताने की… व्हिडीओ शेअर करत आव्हाडांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

Jitendra Aawhad On Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे.

दरम्यान, आता या प्रकारणावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केला आहे. तर त्यांनी यावेळी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे या प्रकरणाला आणखी वेगळ वळणं मिळत असल्याच दिसत आहे. या ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले की, ‘खरे सांगा… काल खरच किती जण मृत्युमुखी पडले… मृत्यू उष्मघातानी की चेंगराचेंगरीत… आयोजक सरकार होते… लपवा लपवी करू नका… जबाबदारीचा स्वीकार करा… cctv footage ताब्यात घ्या आणि जनतेला दाखवा… उच्च न्यायालयाच्या न्यायदिशाचा चौकशी आयोग नेमावा…’ अशी मागणी देखील यामध्ये आव्हाड यांनी केली आहे.

पुढे जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आणि चेंगराचेंगरी होताना दिसत आहे. महिला देखील पडलेली आहे. महाराष्ट्र शासनाची रूग्णवाहिका देखील यामध्ये आहे. तर एक तरूण एका बेशुद्ध महिलेला सीपीआर देताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये आव्हाड म्हणतात की, ‘समाज माध्यमां मधून हा वीडियो आला आहे हा मोर्फ नाही कारण महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते हा चेंगराचेंग्रीचा प्रकार कुठे घडला असावा?’ असं देखील आव्हाड म्हणाले आहेत.

Eknath Khadse : मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारवरचा नागरिकांचा विश्वास कमी होत चालला

नवी मुंबईच्या खारघर येथील सेंट्रल पार्क परिसरात राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन केले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील दिल्लीहून आले होते. शाह यांच्या उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमित शाह येणार असल्यामुळं साहजिकच हा कार्यक्रम भरगच्च होणार होता. या पुरस्कार सोहळ्याला धर्माधिकारी यांच्या लाखो भाविकांनीही हजेरी लावली होती. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात झालेल्या या कार्यक्रमात उष्माघाताने अनेकांचे बळी घेतले, तर शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर राज्य सरकारने मृतांच्या कुटूंबियांना तातडीनं मदत जाहीर केली. मात्र, सरकारने जाहिर केलेली ही रक्कम तोकडी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

Tags

follow us