Eknath Khadse : मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारवरचा नागरिकांचा विश्वास कमी होत चालला

Eknath Khadse : मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारवरचा नागरिकांचा विश्वास कमी होत चालला

The trust of the citizens in the Modi government and the Shinde government is on the decline. : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे यांच्या भाजपप्रवेशाबातच्या चर्चांना अखेर अजित पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे. कारण नसतांना माझ्याबाबत गैरसमज पसरवले जात आहे. बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही, मी राष्ट्रवादीच राहणार, असं भूमिका अजित पवारांनी घेतली. तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) अजित पवार यांच्याविषयी भाष्य केलं. जे लोक देव, देश, धर्म संस्कृतीकरता आणि पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी सोबत येतील, त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही, असं सांगितलं. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी बोलतांना सांगतिलं की, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते एक जबाबदार पदाधिकारी आहेत. त्यामुळं त्यांनी आपल्या पक्षामध्ये लोक येतील, अशी आशा करणं गैर नाही, असा खोचक टोला लगावला.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना राज्याच्या राजकारणात उधाण आलं. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला पोहोचल्यामुळं अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. यावर बोलतांना एकनाथ खडसे यांनी सांगितले की, अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की, ते राष्ट्रवादीतच राहणार आहेत. खरंतर चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते एका राष्ट्रीय पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहेत. त्यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळं त्यांनी आपल्या पक्षामध्ये अन्य नेते येतील, अशी आशा करणं गैर नाही, असा टोला लगावला.

यावेळी बोलतांना एकनाथ खडसे यांनी यावेळी बोलतांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारवही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यासह देशात अनेक समस्या आहेत. राज्यात महागाई प्रचंड वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत आहे. पिकांना भाव नाहीत. नागरीकांच्या या कोणत्याही प्रश्नांकडे ना केद्राचं लक्ष आहे, ना राज्य सरकारने काही केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आणि मोदी सरकारने केवळ घोषणा केल्या. पण, प्रत्यक्षात जनतेला काहीच मिळालं नाही. त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावरील आता नागरिकांचा विश्वास कमी होत असल्याची टीका त्यांनी केली.

Atiq Ahmed: आता मानवाधिकार आयोगाची ‘इंट्री’; यूपी पोलिसांना बजावली नोटीस

ते म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. पेट्रोल, डिझले, गॅसच्या किंती प्रचंड वाढल्या. त्यामुळं सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालं आहे. तरीही सरकार महागाई, बेरोजगारी यावर काही बोलत नाही. नैसर्गिक संकट आणि बाजारभाव नसल्याने देशात सर्वात जास्त आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, मात्र सरकारला याची जराही चिंता उरली नाही. 50 खोके अन् एकदम ओके, अशा मस्तीमध्ये हे आमदार सध्या वावरत आहेत. जनतेचं यांना काही घेणं देणं राहिलेलं नाही. जनतेला या सरकारनं वाऱ्यावर सोडलं आहे, त्यामुळं अशा स्थितीत निवडणुका झाल्या तर भाजपला कमी प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्य्कत केला.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube