Jitendra Awhad On Ajit Pawar : अजितदादा भाजप अन् शिंदेंना स्वस्थ बसू देणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्हा गटातील नेत्यांमध्ये चुरस असल्याचं दिसून येत आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांकडून टीप्पणी केल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी थेट अजितदादांवरच दावा केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतून माध्यमांशी संवाद साधला आहे
Video: नटून-थटून बाहेर पडले अन् गोल गोल फिरले; पिंपरीतील नाट्यसंमेलनावर वंदना गुप्तेंची थेट नाराजी
जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवारांचा स्वभाव असा आहे की, शेजाऱ्याला शांत बसू देत नाहीत. ते कायम यापुर्वी काँग्रेसला डिस्टर्ब करायचे त्यांचा स्वभाव असा आहे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांची कुरघोडी करायची. महायुतीत देखील टपल्या मारायचं काम ते चालूच ठेवणार असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
तसेच ठाण्यात आता गुंडगिरी वाढली असून अजितदादांचा नेम हा एकनाथ शिंदेंवर होता, असं मी ऐकलं असल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पावर गटाकडून बैठक बोलवण्यात आलीयं. या बैठकीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. अजितदादांचा मूळ स्वभाव हा शांत बसू देत नाही. त्यामुळे सगळ्या विभागांची मीटिंग बोलवत असतात, असंही ते म्हणाले आहेत.
आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज नाही; ‘सिंहासन’ची आठवण काढत फडणवीसांचा ठाकरेंना टोला
बिल्कीस बानो प्रकरणाचा निकाल स्वागतार्ह :
बिल्किस बानो प्रकरणाचा निकाल स्वागतार्ह आहे. गुजरातच्या जातीयवादी परंपरेला मोठा धक्का आहे. बिल्कीस मेली आहे, असं त्या लोकांना वाटलं होतं परंतु ती जिवंत राहिली आणि तिने त्यानंतर खटला लढला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. ज्या पद्धतीने एका भगिनी वर बलात्कार होतो याचा आता अंत झाला असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
राहुल नार्वेकरांना राजकीय कोविड की…
येत्या 10 जानेवारील अपात्र आमदारांप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. राहुल नार्वेकरांना कोविड झालायं की तो राजकीय आहे की खरा हे ठाऊक नसल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.