आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज नाही; ‘सिंहासन’ची आठवण काढत फडणवीसांचा ठाकरेंना टोला

आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज नाही; ‘सिंहासन’ची आठवण काढत फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीचं सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळं अनेकदा त्यांच्या मानेला पट्टा लावलेला असायचा. दरम्यान, यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं. मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की, सिंहासन सिनेमा आठवतो. मात्र, आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही, मी कुणाबद्दल बोललो, हे मला सांगायची गरज नाही, अशी फटकेबाजी फडणवीसांनी केली. ते आज शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात बोलत होते.

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, अभिनेता आम्हाला त्यांच्यातलीच समजतात. त्यांचा पक्का विश्वास आहे की, हे नाटक करतातच. काल प्रशांत दामले म्हमाले की, अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं. त्यांनी ही काला जरा आमच्या पक्षातील नेत्यांना सांगावी. मात्र, प्रशांत दामले असे मुख्यमंत्री आहेत, जे लोकांना हसवतात देखील आणि रडवतात देखील, तुम्ही संवेदनशील अभिनेता आहात, असं फडणवीस म्हणाले.

आम्हालाही परिस्थितीनुसार नाटक आणि चित्रपटांचं स्मरण होतं. मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसली की, आम्हाला सिंहासन सिनेमा आठवतो. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज नाही. मी कुणाबद्दल बोलतोय, हे सांगायची देखील गरज नाही, असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

निधी कमी पडू देणार नाही
फडणवीस म्हणाले, पहिले मराठी नाटक १८४६ साली आलं होतं. त्याचचं सीता स्वयंवर. त्यानंतर मुकपट आला. राजा हरिश्चंद्राची फॅक्टरी. त्यानंतर पहिला बोलपट अयोध्येचा राजा १९३२ साली आला. आपण रामापासून वेगळं होऊ शकत नाही. २०३५ साली महाराष्ट्राच अमृतकाळ असेल. या अमृतकाळात आपलं नाटक कुठं असेल, नाट्य क्षेत्रात काय करायला हवं, हे फक्त तुम्ही सांगा. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द फडणवीसांनी दिला

एआय मानवी संवेदना देऊ शकत नाही
आर्टीफिशिला इंटेलिजन्सच जगावा वारपतो, मात्र, त्यांच्याकडे भावना नाहीत. त्यामुळं कितीही एआय आलं तरी कला,संगीत, नाटक यावर काहीही फरक होणार नाही. आपण त्याचा वाहक म्हणून उपयोग करू, पण, ते मानवी संवदेना कधीच देऊ शकणार नाही, असंही फडणवीस म्हणााले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube