Jitendra Awhad : अजित पवार (Ajit Pawar) गटाकूडन सातत्याने शरद पवार (Sharad Pawar) गटावर टीकास्त्र डागल्या जातं. अजित पवार गटाचे आमदार हे शरद पवार गटाच्या नेत्यांवर कायम निशाणा साधत असतात. काल राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांचे निवडणूक चिन्ह तुतारीचे रायगडावर अनावरण करण्यात आले. त्या सोहळ्यात जितेंद्र आव्हाडांनी तुतारी देखील वाजवली. त्यांचा तुतारी वाजवतांनाचा एक व्हिडिओ अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक्सवर शेअर करत टीका केली. त्याला आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोदराद टीका केली.
‘आरएसएस’च्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालकपदी नगरचे नानासाहेब जाधव
आव्हाडांची व्हिडिओ ट्वीट करत मिटकरींनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणाले की, ही तुतारी आहे का पुंगी? आमच्याकडे उन्हाळ्यात कुल्फी विकणारे असंच वाजवतात. कुल्फीवाले. त्यानंतर आता आव्हाडींना पलटवरा केला. तुमच्यासारखी लोकं जी सत्तेपुढे गुडघे टेकतात, त्यांना आदर्शवादाची लढाई काय कळणार…? असा खोचक सवाल केला.
काहीही बोलले तरी खपतं असं समजू नका, अजित पवारांचा जरांगेंना इशारा
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, कुल्पिवाले म्हणून तुम्ही ज्यांची टिंगल करताय, त्याच्या पिपाणीचं महत्व तुम्हाला कळणार नाही, कारण आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रोज तीच पिपाणी वाजवून हा कुल्फीवाला स्वाभिमानाची लढाई लढत असतो. तीच पिपाणी वाजवून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत असतो. त्याच्यासाठी तीच पिपाणी तुतारीच असते, असं आव्हाड म्हणाले.
कुल्फिवाले म्हणून तुम्ही ज्यांची टिंगल करताय,त्याच्या पिपाणीचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही,कारण आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रोज तीच पिपाणी वाजवून हा कुल्फीवाला स्वाभीमानाची लढाई लढत असतो.तीच पिपाणी वाजवून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत असतो.त्याच्यासाठी तीच पिपाणी तुतारीच… https://t.co/NwjyIGc5rd
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 25, 2024
आव्हाड यांनी पुढं लिलिलं की, तुमच्यासारख्या मिध्यांना कष्टकरी कुल्फिवाल्याच्या पिपाणीचं महत्त्व कळणार नाही. कुल्फिवाल्याचा जीवनसंघर्ष ज्यांना हास्यास्पद वाटतोय त्यांनी सर्व मूल्ये आणि तत्त्वांवर केव्हाच पाणी सोडलंय. तुमच्यासारखी लोकं जी सत्तेपुढे गुडघे टेकतात, त्यांना आदर्शवादाची लढाई काय कळणार…? असा सवाल आव्डांनी केला. ते म्हणाले, शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात पिपाणी वाजवणऱ्यांची लढाई ज्यांना कळली नाही ते सामान्य लोकांच्या हक्कांसाठी काय लढणार? शिवरायांनी फुंकलेली तुतारी कष्टकरी लोकांच्या हक्कासाठीच होती, हे विसरू नका. आणि हो, व्हिडिओ एटीडींग मस्त केलेय आता फ्कत चेक नीट लिहायला शिका, असं ट्विट आव्हडांनी केलं.
दरम्यान, आव्हाडांनी केलेल्या टीकेला आता अमोल मिटकरी काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.