Kalaben Delkar : ठाकरे गटातील अनेक नेते उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत आहे. आता दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांनींही ठाकरेंना नारळ दिलाय. त्यांना भाजपने दादर- नगर हवेलीमधून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) उमदेवारी जाहीर केली. त्यांना भाजपच्या (BJP) यादीत स्थान मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
खरतंर डेलकर यांचे पती मोहन डेलकर यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबईतल्या एका हॉटलेमध्ये स्वत:ला संपवलं होतं. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहीलेल्या चिठ्ठीत प्रशासनाल्या काही बड्या अधिकाऱ्यांवर मानसिक छळ केल्याचा ठपका ठेवला होता. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येसाठी दादर नगर हवेलीचे प्रशासक जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यांनी भाजपच्या नेत्यांवरही आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. डेलकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर २०२२ मध्ये पोटनिवडणूक लागली होती. त्या ठिकाणी शिवसेनेने कलाबेन डेलकर यांनी उमेदवारी दिली होती.
Loksabha Election : भाजपने बारामती मनावर घेतले : चंद्रकांतदादांनी साऱ्या नेत्यांना बोलावलं
त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी झंझावती दौरे केले होते. सेनेचे अनेक दिग्गज नेते नगर हवेलीत तळ ठोकून होते. पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर विजय झाल्या होत्या. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा ५१ हजार मतांनी पराभव केला होता. डेलकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाकरेंनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला होता. डेलकर निवडून आल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी त्यांचं औक्षणही केलं होतं. त्या रश्मी ठाकरेंच्या अतिशय निकटवर्तीय मानल्या जातात. भाजपचा पराभव केल्यानं शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी डेलकर यांचं अभिनंदन करत कौतूक केलं होतं.
दरम्यानच्या काळात शिवसेनेत फुट पडल्यानंतरही त्या ठाकरेंसोबत राहिल्या होत्या. मात्र, त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तेव्हापासून त्या भाजपात जाणार अशी चर्चा रंगली होती. ठाकरे गटाची साथसाथ सोडून भाजपावर विश्वास दाखवला. आणि दोन दिवसांपूर्वी अचानक भाजपने डेलकर उमेदवारी दिली.
खरंतर उद्धव ठाकरे यांनी कलाबेन डेलकर यांना त्यांच्या पडत्या काळात साथ दिली होती. त्यांच्या विजयासाठी नियोजन करून भाजपला धडा शिकवला होता. मात्र, आता कलाबेन डेलकर यांनीच ठाकरेंची साथ सोडल्यानं सोडली. डेलकर यांना उमेदवारी देऊन भाजपने ठाकरेंवर मात केली. त्यामुळं आता ठाकरे भाजपला कसं प्रत्युत्तर देणार हेच पाहणं महत्वाचं आहे.