महाराष्ट्रात ना बर्फ पडतेय, ना हिंसा होते; मग 5 टप्प्यात निवडणूका घ्यायची गरज काय? आंबेडकरांचा थेट सवाल
Parkash Ambedkar on Election Commission : देशभरात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार 19 एप्रिलपासून लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी 5 टप्प्यात निवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यावर आता अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Parkash Ambedkar) यांनीही निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे.
Loksabha Election : भाजपने बारामती मनावर घेतले : चंद्रकांतदादांनी साऱ्या नेत्यांना बोलावलं
मुळात 5 टप्प्यात होणारी निवडणूक 5 टप्प्यात निवडणूक आयोग का घेते, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, असं आंबेडकर म्हणाले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्रात ना बर्फ पडत, ना हिंसा होते, मग पाच टप्यात मतदान कशासाठी असा सवाल त्यांनी केला.
बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’चं वादळ; 9 दिवसात बजेटचे डबल पैसे वसूल, किती केली कमाई?
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला फटकारले. यावेळी ते म्हणाले, मी 1984 पासून निवडणूक लढवत आहे. आजपर्यंत मला संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकांच्या काळात कुठेही गडबड झालेली दिलली नाही. कुठं दंगा झालेला नाही.
एवढेच काय, राज्यात दगड मारायला माणूसही मिळत नाही. राज्यात दोन टप्प्यातील निवडणुका पाच टप्प्यात घेण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी केला.
निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे
ते म्हणाले, महाराष्ट्रात कुठेही दळणवळणाची समस्या नाही. कुठेही बर्फवृष्टी नाही. कुठं पाऊस नाही. मग पाच टप्पे का? याचं स्पष्टीकरण द्यावं. शांत महाराष्ट्र हा अशांत करायला इलेक्शन कमिशन निघाल आहे का? असा सवाल करतांनाच राज्यात दोन टप्प्यात निवडणुका झाल्या पाहिजे, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही निवडणुक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ५ टप्प्यात महाराष्ट्रात मतदान घेणं हे कोणाच्या सोईसाठी केलं? मुळात दोन टप्प्यात मतदान होऊ शकते. असं असतांना देशभरात सात टप्प्यात आणि महाराष्ट्रात पाच मतदान घेण्याची गरज नाही, यातून कोणाची सोय करायची आहे, असा सवाल पाटील यांनी केला.