Download App

नितीश कुमारांना महाराष्ट्रात धक्का! कपिल पाटलांकडून ‘समाजवादी गणराज्य पक्षाची घोषणा

  • Written By: Last Updated:

Kapil Patil : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर नितीशकुमार यांना मोठा धक्का बसला आहे. जनता दल युनायटेडचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray उपस्थितीत नव्या पक्षाची घोषणा केली. समाजवादी गणराज्य पार्टी हे त्यांच्या पक्षाचं नाव आहे.

माढ्याचे खासदार निंबाळकरांच्या ताफ्यावर गाजरांचा पाऊस, संतप्त कार्यकर्त्यांनी केला निषेध 

जनता दल युनायटेड पक्ष भाजपसोबद गेल्यानं कपिल पाटील हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जात होते. एनडीएसोबत जाण्याच्या नितीशकुमारांच्या भूमिकेशी कपिल पाटील सहमत नसल्यामुळे त्यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी आता आपला समाजवादी गणराज्य पार्टी हा नवा पक्ष स्थापन केला आहे. धारावीत होणाऱ्या संयुक्त समाजवादी परिषदेत त्यांना आपल्या पक्षाची घोषणा केली.

नवनीत राणा भाजपात जाण्याची चर्चा, बच्चू कडू म्हणतात, ‘त्यांचं अंतर्मनच भाजपचं…’ 

बगलेत राम नाही तर नथूराम
यावेळी बोलतांना कपिल पाटील म्हणाले, नितीशकुमारांनी भाजपसोबत जाऊन जेव्हा पटली मारली, तेव्हा मला पहिला फोन उद्धव ठाकरेंचा आला. खुद्द शरद पवारांनीही मला भेटायला बोलावलं आणि माझ्याशी चर्चा केली. नितीशकुमार भाजपसोबत गेले असले तरी आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत आहोत. मी कधीही तडजोड केली. फॅसिस्ट शक्ती सोबत कधी गेलो नाही. आज देशातील फॅशिस्ट शक्ती पक्ष फोडत आहे, ही फॅसिस्ट शक्ती केवळ मुसोलिनी हिटलरीच कॉपी नाही. हा नथुरामी फॅसिसम आहे. यांच्या बगलेत राम नाही तर नथूराम आहे आणि हातात मनुस्मृीत आहे. यांनी आधी महात्मा गांधीचा बळी घेतला. त्यानंतर दाभोळकर-पानसरे यांची हत्या केली. जे जे विरोधात उभे राहतात, त्यांचा बळी घेण्याचं काम ते करतात, अशा शब्दात भाजपवर टीका केली.

उद्धव ठाकरेंचं आणि आमचं नात साठ सत्तर वर्षापूर्वीच आहे. समाजवादी चळवळीचे जे नेते होते, त्यांच्यासोबत प्रबोधनकार ठाकरे होते. महात्मा गांधींना सात वेळा मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दोन वेळा ही हत्या उधलून लावण्याचं काम प्रबोधनकारांनी केल. आणि आज उद्धव ठाकरे लोकशाही वाचवण्याचं काम करत आहे, असं पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांच्या रस्त्यांवर खिळे ठोकणार सरकार
देशात शेतकरी दिल्लीत आंदोलन करतो आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या रस्त्यांवर खिळे ठोकतं, हे खिळे ठोकणारं सरकार आहे. मणिपूरमध्ये स्त्रियांना नग्न करून धिंड काडली जाते, पण मोदींना यावर बोलयाला फुरसत नाही. देशात शेतकरी आत्महत्या चालू आहे, त्याला सरकारची धोरणं कारणीभूत आहेत, अशी टीकाही पाटील यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे अशोक बेलसरे, अनिल देसाई, अनिल परब, वर्षा गायकवाड आदी नेते उपस्थित होते.

follow us