Siddaramaiah : कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपला रोखले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना मोठी ऊर्जा मिळाली आहे. कर्नाटकच्या विजयात मोठा वाटा असलेले व मुख्यमंत्री झालेले सिध्दरामय्या यांना आता काँग्रेसने दुसऱ्या राज्यात सक्रीय केले आहे. सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे महाराष्ट्रात येणार आहेत. ते एक सभा घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) यांनाही भेटणार आहेत. (karntaka siddaramaiah-sangli-loksabha-meet-sharad-pawar)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व नेते अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. नाना पटोले म्हणाले, मी व अशोक चव्हाण हे दिल्लीला सातत्याने जात आहे.
BCCIच्या माजी प्रमुखांवर अंबाती रायुडूचा मोठा आरोप, म्हणाला ‘माझं करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला’
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी हे सर्व काही चालू आहे. पक्षाचे हायकमांड हे दिल्लीमध्ये बसतात. त्यामुळे आम्हाला दिल्लीला जावे लागते. त्याचा वेळ अर्थ काढू नका. महाराष्ट्रात पक्ष कसा बळकट करता येईल. महाविकास आघाडीबरोबर कसे यश मिळविता येईल, याची चर्चा आम्ही करत आहोत.
बीआरएसचा धोका ओळखला ! महाविकास आघाडीत आणखी पक्ष येणार
त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे येत आहे. त्यांची उपस्थितीत सांगली येथे येत्या २५ जून रोजी एक सभा होत आहे. या सभेनंतर सिद्धरामय्या हे शरद पवार यांची बारामतीत भेट घेणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. सांगली येथूनच काँग्रेस लोकसभा निवडणुकीची रणशिंग फुंकणार आहे यावरून दिसून येत आहे.