बीआरएसचा धोका ओळखला ! महाविकास आघाडीत आणखी पक्ष येणार

  • Written By: Published:
बीआरएसचा धोका ओळखला ! महाविकास आघाडीत आणखी पक्ष येणार

प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी

Congress: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला दलित आणि मुस्लिम मतांची जुळवणी करावी लागणार आहे. या मतांचे विभाजन झाल्यास काँग्रेसला (Congress) मोठा फटका बसतो हे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसले आहे. यासाठी काँग्रेस आता नव्या भिडूच्या शोधत आहे. आमच्याबरोबर काही समविचारी पक्ष येतील, अशा नेत्यांसोबत बोलणी सुरू असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले आहे. या पक्षाची नावे नाना पटोले यांनी सांगायची टाळली आहेत. पण लवकर यांच्यासोबत बोलणी पूर्ण होईल, असेही पटोले यांनी सांगितले आहे. (maha-vikas-agadi-ready-to-new-alliances)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आता प्रकाश आंबेडकर जाणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांना आता मित्रपक्षाची गरज आहे.
महादेव जाणकर, राजू शेट्टी, शेतकरी कामगार पक्ष , बहुजन विकास आघाडी असे अनेक लहान मोठे (पक्ष शेकाप सोडून) भाजपसोबत जवळीक दाखवत असले तरी आपली भूमिका कधीही बदलू शकतात. त्यामुळे या पक्षांना काँग्रेस जवळ करेल का ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

‘शिंदे हे मुख्यमंत्री होणार, हे फडणवीस यांना माहित नव्हतं’ : देशमुख यांनी भाजपला चोळले मीठ

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे गट महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहेत. या तिन्ही पक्षात जागा वाटप करताना कोणाची ताकद किती हे देखील तपासले जाणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष अधिकाधिक लहान पक्षाना विशेषतः रिपाई आणि मुस्लिम मत जोडणाऱ्या पक्षाना संधी देतील. त्यामुळे काँग्रेस ची लहान पक्षासोबत बोलणी सुरू आहे.

बारामतीकरांनी अडविलेले पाणी मराठवाड्याला पुन्हा भेटणार, फडणवीसांचा महत्वपूर्ण निर्णय

एकीकडे लहान पक्ष भाजपसोबत जात आहेत. जे भाजपला कंटाळले किंवा भाजपपासून दुखावले ते अजूनही महाविकास आघाडीकडे आले नाहीत. त्यांना भविष्यात बीआरएस हा मित्र पक्ष म्हणून आवडू लागला आहे.

बीआरएसचे महत्त्व वाढण्यापूर्वी काही मित्र पक्ष जोडता येतात का ? हा काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील विचार आहे . या सर्व बाबी पाहता काँगेस ने आता मित्र पक्ष जोडण्याची तयारी सुरु केलीय.

सध्या काँग्रेससोबत कोण ? त्यांची ताकद किती? असे किती मित्रपक्ष येतील या सर्व गोष्टी लवकर समोर येतील. एवढे नक्की आहे काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube