बारामतीकरांनी अडविलेले पाणी मराठवाड्याला पुन्हा भेटणार, फडणवीसांचा महत्वपूर्ण निर्णय

  • Written By: Published:
बारामतीकरांनी अडविलेले पाणी मराठवाड्याला पुन्हा भेटणार, फडणवीसांचा महत्वपूर्ण निर्णय

महाविकास आघाडीच्या काळात कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु आमच्या सरकारने बारामतीकरांनी अडविलेले पाणी मराठवाड्याला पुन्हा दिले. कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी केली, यावेळी ते बोलत होते.

कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे येत्या एक वर्षात नागरिकांपर्यंत पोहोचेल असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मी मुख्यमंत्री असताना कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू केले. मात्र मधल्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्या सरकारने एकही सुधारीत मान्यता दिली नाही. त्यामुळे ते काम रखडले होते, असेही ते म्हणाले. (The water blocked by the Baramatikars will meet Marathwada again, an important decision of Fadnavis)

सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्याची ताकद आम्हाला मिळावी अशीच मागणी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर भवानीच्या चरणी केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हणाले. आईचा आशीर्वाद निश्चितपणे आम्हाला प्राप्त होईल. हे जे कार्य आम्ही हातात घेतले ते कार्य आम्ही निश्चितपणे पूर्ण करू आणि तहानलेल्या मराठवाड्याला पाणी देण्याचे काम आम्ही या ठिकाणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहित पवार-राम शिंदें यांच्या कार्यकर्त्यांतील वाद टोकाला ! फेसबुक कमेंटवरून भिडले

तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले…यासोबतच समुद्रात वाहून जाणारे पाणी वेगवेगळ्या लिफ्टच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचे काम आपण करणार आहोत. 2019 मध्येच आपण या संदर्भातली सर्व संकल्पना पूर्ण केली असून त्याला सर्व मान्यता देखील देण्यात आल्या होत्या. मात्र, दुर्दैवाने मधल्या काळात आपलं सरकार नसल्यामुळे ते काम झालं नाही. मात्र आता हे काम लवकरच हाती घेऊन पूर्ण करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठवाडा दुष्काळग्रस्त होता हे इतिहास जमा होईल, असा दावा देखील फडणवीस यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube