Download App

मला पोलिसांसमोर वाल्मिक कराडने मारहाण केली, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

Karuna Munde Allegations On Walmik Karad : करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मला पोलिसांसमोर वाल्मिक कराडने (Walmik Karad) मारहाण केली, असं त्या म्हणाल्या आहेत. लोकांची रस्त्याची कामं घेवून मी आठ – नऊ महिन्यांपूर्वी मी कलेक्टर ऑफिसला गेले होते, तिकडे त्यांनी मला बघितलं. ते मला कलेक्टरच्या केबिनमध्ये हात पकडून गेले आणि काही न विचारता, कशाला तु इकडे आली? असं म्हणत मला मारहाण सुरू केली. त्यावेळी माझे पती धनंजय मुंडे (Dhanajay Munde) देखील तिथेच होते.

कलेक्टर ऑफिसमध्ये सीसीटीव्ही होते, ते फुटेज द्यावे असं निवेदन दिलं होतं. वाल्मिक कराडला मला हात लावायचा अधिकार कोणी दिला? धनंजय मुंडे आणि गॅंगमध्ये वाल्मिक कराडसारखे खूप लोकं आहेत, असं न्यायालयात देखील सांगितलं असल्याचं करूणा मुंडे म्हणाल्या आहेत. न्याय देवू शकत नाही, पण ते सीसीटीव्ही फुटेज द्या. ते मी माझ्या मुलांना देवू शकते, सांगु शकते तुमचा बाप कसा आहे. महाराष्ट्रात महिलांना न्याय मिळू शकत नसल्याचं वक्तव्य त्या म्हणत आहे.

रेपो रेट कपातीनंतर 25 लाख अन् 1 कोटींच्या कर्जावर किती EMI! जाणून घ्या, डिटेल्स..

दारू पिवून माझ्या नवऱ्याने मला घरात मारलाय. माझ्या नवऱ्याला मला मारून टाकण्याचा अधिकार आहे, पण वाल्मिक कराडला तो अधिकार कोणी दिला? जर तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये पोलिसांसारखे मारहाण करू शकता, इतकी भयंकर परिस्थिती महिलांची महाराष्ट्रात असल्याचं करूणा मुंडे यांनी म्हटलंय. कदाचित कृष्णा आंधळेला मारून टाकलं असेल. वाल्मिक कराड इतके दिवस गायब होता, तेव्हा तो कदाचित पुरावे नष्ट करत असेल. 1996 पासून मी धनंजय मुंडेंसोबत नवऱ्या बायकोसोबत आहे.

जेव्हा मी गरोदर होते, तेव्हा मी वाल्मिक कराडचं नाव ऐकलं होतं. तेव्हा मी औरंगाबादमध्ये आले होते, तेव्हा मारहाण करून मला पुन्हा इंदौरला पाठवलं होतं. खूप गोष्टी आहेत, धनंजय मुंडे आणि गॅंगमध्ये देखील खूप आका आहेत , पण त्याबद्दल आता मी तोंड उघडणार नाहीये, असं देखील त्यांनी सांगितलंय. औरंगाबाद, सांगली आणि पुण्यात ते धनंजय मुंडेंच्या पावरवर जमिनी हडपण्याचं काम करत आहेत. माझ्याकडे ते पुरावे देखील आहेत. या सगळ्यांचा बाप धनंजय मुंडे आहे. कोणाच्या पावरवर परळीत पोलीस अधिकारी राहतात, असं त्या म्हणाल्या आहेत.

पुण्यात गळती… वसंत मोरेंसमोर मोठं आव्हान, उद्धव ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी

धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीसोबत घाणेरडं कृत्य केलं होतं. 2021 मध्ये ही घटना घडली. त्यावेळी मी गरोदर होती. मुलाच्या पोस्टवर बोलताना करूणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे चांगला बाप आहे. त्यांनी मुलाबाळांना कधीही दुखावलं नाहीये. मुलगा पाहिजे होता, मुलगा दिलाय. पण त्यांना देखील तो न्याय देत नाही. घेवून जा ना त्यांना सभेत, मुलाला न्याय द्या, असं देखील करूणा मुंडे यांनी म्हटलंय. दरवेळी मी महिला आयोगात गेलीय. रूपाली चाकणकर कोणालाही न्याय देत नाही. जमिनीपासून वरपर्यंत यांची सत्ता आहे, मग काय करणार? असं करूणा मुंडेंनी म्हटलंय. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे, अशा नेत्याला तुम्ही पाठबळ देत आहात. अजितदादा, देवेंद्र फडणवीस तुम्ही इतके लाचार आहात का? असा सवाल देखील त्यांनी केलाय.

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे दोषी असल्याचं सिद्ध झालंय. करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. त्यांना मारहाण झालीय. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये. करुणा शर्मांना दरमहा 2 लाख पोटगी द्यावी, असे निर्देश कोर्टाने दिलेत. वांद्रे कौंटुबिक न्यायालयाने हा निकाल दिलाय. मी 15 लाख दरमहिना मागितले होते, त्याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं करूणा मुंडे यांनी म्हटलंय.

 

follow us