Download App

Kiran Mane : किरण मानेंची राजकारणात एन्ट्री; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधणार शिवबंधन

Kiran Mane : ‘बिग बॉस’ फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) लवकरच राजकीय इनिंग सुरू करणार आहेत. किरण माने यांचा ठाकरे गटातील प्रवेश निश्चित झाला असून आज माने शिवबंधनात अडकतील अशी चर्चा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किरण माने यांचा पक्षप्रवेश होईल. किरण माने सोशल मीडियावरही कायम चर्चेत असतात. विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. त्यानंतर आता माने थेट राजकारणातच प्रवेश करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Kiran Mane: ‘जरांगे पाटलांच्या धैर्याला सलाम’ किरण मानेंची मराठा आरक्षणाबद्दल खास पोस्ट

मुलगी झाली हो या मालिकेच्या माध्यमातून किरण माने घराघरात पोहोचले होते. मात्र भाजप आणि सत्ताविरोधी भूमिका घेत असल्याने आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याच आरोप माने यांनी केला होता. त्यावेळी हा वादही खूप चर्चेत राहिला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सहकार्याने माने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. किरण माने यांच्या व्यतिरिक्त आणखीही काही प्रवेश ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी होणार आहेत.

किरण मानेंच्या ठाकरे गटातील प्रवेशाने ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.  त्यांच्याबरोबच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही काही कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. निवडणुकांआधी होत असलेल्या या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, किरण माने यांची एक राजकीय पोस्ट मध्यंतरी व्हायरल झाली होती. माने मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील नावाची व्यक्तिरेखा साकारत होते. त्याचवेळी त्यांनी ही पोस्ट केली होती.

यानंतर मात्र त्यांना मालिकेतूनच काढून टाकण्यात आले होते. राजकीय दबावातून वाहिनीने हा निर्णय घेतल्याचा आरोप  माने यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर माने सातत्याने विविध मुद्द्यांवर मत मांडत असतात. पोस्ट लिहिताना त्यांची एक खास स्टाईल असते. त्यांची ही स्टाईल लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

किरण मानेंचं फेसबुक पेज हॅक; पोस्ट शेअर करत थेट म्हणाले, “माझ्या फॉलोअर्सपैकी…”

follow us

वेब स्टोरीज