किरण मानेंचं फेसबुक पेज हॅक; पोस्ट शेअर करत थेट म्हणाले, “माझ्या फॉलोअर्सपैकी…”

किरण मानेंचं फेसबुक पेज हॅक; पोस्ट शेअर करत थेट म्हणाले, “माझ्या फॉलोअर्सपैकी…”

Kiran Mane Facebook hacked: मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) हा कायम चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’तून (Bigg Boss Marathi) किरण माने घराघरात पोहोचले आहे. दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ‘सिंधुताई माझी माई’ (Sindhutai Majhi Mai) या सिरियलमधील त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची माने कायम जिकली आहेत. सोशल मीडियावर (social media) किरण माने मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अनेक वेगवेगळ्या विषयांवर फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ते चाहत्यांना अपडेट देत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)


आता नुकतंच किरण मानेंच्या सोशल मीडिया अकाउंटबाबत एक महत्वाची बातमीची समोर आली आहे. किरण मानेंचं फेसबुक पेज हॅक (Facebook hacked) झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे. मानेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तसेच या पोस्टमधून त्यांनी चाहत्यांना एक विनंती देखील केली आहे. मानेंनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “बुहतेक माझे फेसबुक पेज हॅक झाले आहे. अचानक डिसेबल करण्यात आले आहे. माझ्या फॉलोअर्सपैकी कुणी याचा टेक्निकल गोष्टीमधील जाणकार असेल तर मला DM करा, अशी पोस्ट अभिनेत्याने यावेळी केली आहे.

याअगोदर अनेक मराठी कलाकारांचे सोशल मीडियावरील पेज हॅक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री क्षिती जोगचं देखील फेसबुक पेज हॅक करण्यात आलं होतं. या पेजवरून काही अश्लील व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याचे समोर आले होते. तसेच मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचं इन्स्टाग्रामवरील पेज देखील हॅक झाले असल्याची बातमी समोर आली होती.

रणबीर नंतर तृप्ती डिमरी करणार विकी कौशलसोबत रोमान्स; लवकरच दिसणार एकत्र

किरण मानेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ‘मुलगी झाली हो’ या सिरियलमधून त्यांना खरी ओळख मिळाली आहे. आतापर्यंत अनेक सीरियलमध्ये किरण मानेंनी दमदार अभिनय केले आहेत. सध्या कलर्स मराठीवर सुरू असलेल्या ‘सिंधुताई माझी माई’ सीरियलमध्ये त्यांनी सिंधुताई सपकाळ यांचे वडील अभिमान साठेंची मुख्य भूमिकेत बघायला मिळत आहे. ही भूमिका चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube