मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कुणाची यावरून ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (Shinde group) यांच्यात गेल्या आठ नऊ महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात काल निवडणूक आयोगाने (Election Commission) निकाल देताना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी गळती लागण्याची शक्यता आहे. तसं धक्कादायक विधान खासदार कृपाल तुमाने (MP Kripal Tumane) यांनी केले याहे. शिवसेना काल निवडणूक आयोगाने आम्हाला दिली असून, एकनाथ शिंदे हे यापक्षाचे प्रमुख आहेत, असे सांगतानाच उरलेले आमदारही आमच्याच चिन्हावर निवडून आले आहेत, ते आमच्यासोबत येणार आहेत, असा दावा खासदार तुमाने यांनी केला आहे.
शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे गटाकडे सहा खासदार राहिल्याच्या दावा त्यांच्याकडून केला जात होता. मात्र, या सहापैकी आयोगाला प्रत्यक्षात ठाकरे गटाचे चारच खासदारांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे सध्या ठाकरे गटात असलेला आणखी दोन खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच शिंदे समर्थक खासदार तुपाने यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
तुमाने म्हणाले की, दसऱ्याच्या वेळेसच दोन्ही खासदार आमच्यासोबत येणार होते. मात्र तेव्हा न आलेले 2 खासदार आणि 10 आमदार हे आमच्यासाबेत तुम्हाला दिसतील. त्यांनी आमच्याच चिंन्हावर निवडणूक लढवली असून ते आमचेच असल्याचा दावा तुमाने यांनी केला आहे.
खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, शिवसेनेचा विजय झालेला आहे. निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. एकनाथ शिंदे हे आमचे नेतृत्व असून आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही पुढे नेणार आहोत. निवडणूक आयागाने दिलेला निर्णय अपेक्षित होता.
सर्वोच्च न्यायालयातील निर्णयही आमच्या बाजूने लागेल. आम्ही जिंकणार यात शंकाच नाही, असा विश्वास व्यक्त करून बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीकडे धनुष्यबाण गहान ठेवला होता. तो आज आमच्याकडे आला असल्याचं त्यांनी सांगितले आहे.