Laxman Hake Criticize Manoj Jarange On Kailash Borade : जालना जिल्ह्यातील आन्वा गावात महाशिवरात्रीला धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून कैलास बोराडे (Kailas Borade) नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण करण्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. तर हा व्यक्ती दारू पिलेला असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) पत्रकार परिषद घेत केलाय. यावर आता लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) पत्रकार परिषद घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
लक्ष्मण हाके म्हणाले की, आज मनोज जारांगे यांनी प्रेस घेतली. त्यानंतर मी प्रेस घेतोय. महादेवाचा भक्त एक शेतमजूर या तरूणाला गावगुंडांनी जीवे मारण्याचा केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. मी एसपी, डीवायएसपी सगळ्या प्रशासनाला घेवून त्या गावात गेलोय. जरांगे नावाचा माणूस दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचं काम करतोय. नवनाथ दौंड पाटील नावाच्या व्यक्तीने बोराडेला मारण्याचा प्रयत्न केलाय. तो जरांगेंचा उजवा हात आहे, नेहमी त्यांच्यासोबत असतो, असं देखील लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलंय. त्याचा फोटो जरांगेसोबत आहे, म्हणून त्यांना आरोपी करा, असं मी म्हणणार नाही, असं देखील हाकेंनी म्हटलंय.
‘छावा’ चित्रपटाचा वाद…सकारात्मक निर्णय घेऊ, उदयनराजे भोसलेंचे शिर्के घराण्याला आश्वासन
हाके म्हणाले की, एका धनगर तरुणाला जालना येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मी पोलिसांना भेटलो. जरांगे पाटील कोणत्याही कारणावरून राज्यात दोन जातीत भांडण लावण्याचे काम करत आहे. बोराडे याला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी आहे. आज जरांगे यांनी बोराडेचा दारू पिल्याचा व्हिडीओ दाखवला. तो महादेव भक्त आहे, जवळ मंदिर आहे महाशिवरात्रीला गेला होता, मात्र त्या माणसाने समाज विघातक कृत्य केलेलं नाही.
राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर! अर्थमंत्री अजित पवारांनी अहवाल मांडला; वाचा, काय आहे सत्य?
अर्धवट कपड्यात गेला, दारू पिलेला असल्याचा असा आरोप जरांगे करत आहेत. अश्लील हावभाव केला म्हणून मारणार का? पोलिस यंत्रणा आहे. मंदिरातील पुजारी आणि कुंभमेळा मधील साधू काय पूर्ण कपड्यात असतात का? जरांगे याच्या अजेंड्यावर ओबीसी नेते असतात, मी असतो. रोहित पवार यांची आयटी सेल जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. जरांगे यांची गृहखात्यामार्फत चौकशी करा, अशी आमची मागणी आहे.
मुखमंत्र्यापासून सगळे नेते राजकारण करत आहेत. आम्हाला पाठिंबा, न्याय का देत नाही? कैलास बोराडे यांना न्याय मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देणार असतील, तर आम्ही त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिलाय.