Download App

विधानसभेने दाखवून दिले खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांचा वारसादर कोण ? एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

आपल्या शिवसेनेने 80 जागा लढून तब्बल 60 जागा जिंकल्या आहे. हा दैदिप्यमान विजय आहे. आता सांगा खरी शिवसेना कुणाची आहे,

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde On Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेने ‘शिवोत्सव’ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीत तुमच्यापेक्षा पंधरा लाख मते शिवसेनेला (Shivsena) मिळाली. तुम्ही 97 जागा लढविल्या आणि वीस जागा जिंकल्या. आपल्या शिवसेनेने 80 जागा लढून तब्बल 60 जागा जिंकल्या आहे. हा दैदिप्यमान विजय आहे. आता सांगा खरी शिवसेना कुणाची आहे, बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार कोण ? महाराष्ट्रातील जनतेने हे शिक्कामोर्बत केले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी एेवढेच सांगतो, अभी ते मापी है मुठीभर जमीन, अभी पुरा अस्मान बाकी है.

अमित शाह किस झाड की पत्ती, मराठी माणसांचा नाद करू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे म्हणाले, आता म्हणाले स्वबळावर निवडणूक लढविणार. स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी मनगटात ताकद लागते. त्यांना बाळासाहेबांची विचार आणि जयंती आता आठवते. स्मारकात गेल्यानंतर बाळासाहेबांची विचार सोडले, त्यांना आम्ही बोलविणार नाही. खरं जे बाळासाहेबांचा विचाराच्या मारक ते काय बांधणार स्मारक, अशी परिस्थिती आहे. म्हणून तुम्हाला हे बोलविण्याचा नैतिक अधिकार नाही. २०१९ ला तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडण्याचे पाप तुम्ही केले आहे. म्हणून मी तर सांगतो त्या दिवशी बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी, त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होते. आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलो. खुर्चीसाठी बाळासाहेबांची विचार पायदळी तुडवले. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहे. मी आपल्याला एेवढेच सांगतो. अयोध्यात राम मंदिर उभारले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी हे घडवून आणले आहे. त्यांनी बाळासाहेबांची स्वप्न साकार केले. त्यांच्यावर तुम्ही काय-काय बोलतायत.

वेदांता गेला किती दिवस सांगणार? आम्ही १५ लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक आणली; उदय सामंत

लोकसभेला फेक नॅरेटिव्ह पसरवून मते मिळविली. लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. तेव्हा शिवसेनेचे स्टाइक जास्त होता. दोन लाख जास्त मते मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत तुमच्यापेक्षा पंधरा लाख मते शिवसेनेला मिळाली. तुम्ही 97 जागा लढविल्या आणि वीस जागा जिंकल्या. आपल्या शिवसेनेने 80 जागा लढून तब्बल 60 जागा जिंकल्या आहे. हा दैदिप्यमान विजय आहे. आता सांगा खरी शिवसेना कुणाची आहे, बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार कोण ? महाराष्ट्रातील जनतेने हे शिक्कामोर्बत केले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी एेवढेच सांगतो, अभी ते मापी है मुठीभर जमीन, अभी पुरा अस्मान बाकी है.

जिंकण्यासाठी भुजांमध्ये ताकद लागते
जिंकण्यासाठी भुजांमध्ये ताकद लागते. घरात बसून, तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो, अशा निवडणुका जिंकता येत नाहीत. कार्यकर्त्यांची मनं जिंकता येत नाही. कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावर उतरून काम करावे लागते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

follow us