Legislative Council By Election Umesh Mhatres Application Rejected : विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानपरिषदेची निवडणूक (Legislative Council By Election) बिनविरोध होणार असल्याची माहिती मिळतेय. कारण अपक्ष उमेदवाराचा (Umesh Mhatre) अर्ज बाद करण्यात आलाय. राज्यात विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. भाजपने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. संजय केनेकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांना भाजपकडून (BJP) उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवारांनी (Ajit Pawar) संजय खोडके यांना रिंगणात उतरवले आहे.
शेअर मार्केटमधून परताव्याचे अमिष; कोट्यावधींची फसवणूक करणारा भामटा गजाआड…
तर अपक्ष उमेदवार उमेश म्हात्रे यांचा अर्ज बाद करण्यात आलाय. म्हात्रे यांच्याकडे आमदाराच्या पाठिंब्याचे पत्र नव्हते. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद केल्याची माहिती मिळतेय. यामुळे आता विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार (Maharashtra Election) असल्याचं स्पष्ट दिसतंय. तर अर्ज मागे घेण्यासाठी 20 तारखेपर्यंत मुदत आहे. मात्र 20 तारखेनंतर निवडणूक अधिकारी बिनविरोध निवडणूक संदर्भात अधिकृत घोषणा करतील.
गुलीगत सूरज चव्हाणच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा “झापुक झुपूक” टिझर रिलीज!
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे त्यांच्याकडून एकही उमेदवार देण्यात आलेला नाही. तर पुण्यातील दौंड तालुक्यातील उमेश म्हात्रे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. आज दुपारी या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. म्हात्रे यांच्या अर्जावर आवश्यक असलेल्या 10 आमदारांच्या सूचक अन् 10 आमदारांच्या अनुमोदक सह्या नव्हत्या.याशिवाय नोटरी देखील नव्हती. त्यामुळे म्हात्रे यांचा अर्ज बाद झाला आहे. आता विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी केवळ पाच जणांचे अर्ज शिल्लक आहेत, एक अर्ज बाद झालाय. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट आहे.