Download App

लेट्सअप विश्लेषण : राहुल गांधींच्या पराभवाची भीती की रणनीती?; ‘शहजादें’ साठी काँग्रेसचा मोठा डाव!

गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव करून विजय मिळवला होता. यावेळीही स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गांधी घराण्याचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेली आणि अमेठी लोकसभा जागांसाठी काँग्रेसने अखेर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अमेठी मतदारसंघातून किशोरी लाल शर्मा (केएल शर्मा) यांना तिकीट देण्यात आले आहे. हे दोन्ही नेते आज (दि.3) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, राहुल गांधींनी लोकसभा लढवण्यासाठी अमेठीऐवजी रायबरेलीची जागा निवडण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबदद्लच घेतलेला हाआढावा… (Why Congress Give Amethi Loksabha Seat To Rahul Gandhi )

पंतप्रधान मोदी घाबरले, त्यांच्या डोळ्यातून स्टेजवर अश्रू येतील, राहुल गांधींनी लावला टोला

अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघ गांधी घराण्याच्या पारंपारिक जागा मानल्या जातात. गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव करून विजय मिळवला होता. यावेळीही स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात काँग्रेसने राहुल गांधींऐवजी किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर, राहुल गांधी आता आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि आजी इंदिरा गांधी यांच्या रायबरेलीतून नशीब आजमावणार आहेत. राहुल गांधींना अमेठीऐवजी रायबरेलीतून रिंगणात उतरवणे हा काँग्रेसच्या विचारपूर्वक केलेल्या रणनीतीचा भाग आहे की यामागे पराभवाची भीती आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भीतीपोटी सोडली अमेठी की रणनीतीचा भाग?

काँग्रेसने अमेठीची जागा सोडून रायबरेलीतून राहुल गांधींनी निवडणुकीच्या रिंगणात पराभवाच्या भीतीने नव्हे तर, भाजपची रणनीती फसवण्यासाठी केल्याचे मानले जात आहे. 2024 च्या निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे मोदी विरुद्ध राहुल यांच्याभोवती असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत राहुल गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवली असती तर, हे चित्र राहुल विरुद्ध इराणी असे बदलले असते. हे चित्र निर्माण होऊ नये म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठीऐवजी रायबरेलीतून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

लेट्सअप विश्लेषण : कमळाला का पडली इंजिनाची गरज; ही आहेत हायलाईटेड 5 कारणं

… प्रियांका गांधींच्या माघारीमागचं कारण काय?

राहुल गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवली असती, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी द्यावी लागली असती. परंतु, प्रियांका गांधींना लोकसभा निवडणूक लढवण्याची कोणताही इच्छा नव्हती. याशिवाय जर, प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असत्या तर, भाजपला घराणेशाहीच्या मुद्द्यावर काँग्रेसला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली असती. त्यामुळे काँग्रेसने हे आयतं कोलीत भाजपच्या हाती देण्याचं प्रकर्षाने टाळलं.

प्रचारावर झाला असता परिणाम

घराणेशाहीचा मुद्द्याशिवाय जर, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघांनाही काँग्रेसने मैदानात उतरवलं असतं तर, दोन्ही नेते आपापल्या मतदारसंघात व्यस्त झाले असते. याचा परिणाम देशातील इतर भागात होणाऱ्या प्रचारावर झाला असता हे टाळण्यासाठीही काँग्रसकडून प्रियांका गांधींना तिकिट न दिल्याचे सांगितले जाते.

लेट्सअप विश्लेषण : तिसरी बार मोदी सरकार! भाजपचा न डगमगता 400 जागांचा दावा कुणाच्या जोरावर

राहुल गांधींना रायबरेलीतून उतरण्यामागची रणनीती

रायबरेलीतून राहुल गांधींना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यामागे काँग्रेसची मोठी रणनीती आहे. राहुल गांधींनी त्यांचा मतदार संघ सोडून पळ काढला हा धब्बा बसू नये हे यामागचं सर्वात मोठं कारण आहे. आता राहुल गांधी रायबरेलीतून मैदानात असल्याने प्रचारात भाजप काँग्रेसवर काय आरोप करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राहुल गांधींची इमेज पळकुटा म्हणून होऊ नये हे टाळण्यासाठी आणि भाजपला आरोप करण्याचं आयतं कोलित मिळू नये म्हणूनच राहुल गांधींना काँग्रेसने अमेठीऐवजी रायबरेलीच्या जागेवरून उभे केले आहे.

अमेठी-रायबरेलीशी काँग्रेसचे जवळचे नाते

अमेठी आणि रायबरेलीशी काँग्रेस आणि नेहरू-गांधी परिवाराचे संबंध चार पिढ्यांपूर्वीपासूनचे आहे. तर, संजय गांधींनी 1977 मध्ये अमेठीतून निवडणूक लढवली तेव्हापासून गांधी घराण्याची अमेठीशी जवळीक आहे. तर, सोनिया गांधींच्या सासूबाई इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवली होती आणि जिंकून खासदार बनले होते, त्यानंतर इंदिरा गांधींनी अमेठी ही जागा त्यांची कर्मभूमी बनवली. इंदिरा गांधी 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत येथून विजयी झाल्या. यानंतर 1971 आणि 1980 मध्ये त्या खासदार झाल्या होत्या. त्यानंतर 2004 पासून सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून खासदार आहेत.

शरद पवार धनंजय मुंडेंवर इतके का भडकले? वाचा, लेट्सअप खबरबातचं खास विश्लेषण

रायबरेली आणि गांधी घराण्याचे चार पिढ्यांचे नाते

गांधी घराण्याला रायबरेलीची जागा न सोडण्याचे आणखी एक कारण महणजे या मतदारसंघाचे असलेले चार पिढ्यांपासूनचे असलेले ऋणानुबंध. अमेठीची जागा 1977 मध्ये निर्माण झाली आणि येथून संजय गांधींनी पहिल्यांदा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. यानंतर 1980 मध्ये ते ही जागा जिंकण्यात यशस्वी झाले, तेव्हापासून राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी येथूनच निवडणूक लढवली. येथून राहुल गांधी सलग तीन निवडणुका जिंकल्यानंतर 2019 मध्ये पराभूत झाले.

रायबरेलीसाठी राहुल गांधींवर दबाव

राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, तेथून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पण, काँग्रेसची पारंपरिक जागा रायबरेली आणि अमेठी आहे. याच कारणामुळे राहुल गांधींनी या दोन्ही पैकी एका जागेवरून निवडणूक लढवावी असा दबाब त्यांच्यावर होता. याशिवाय निवडणूक जिंकल्यानंतरही आपण वायनाडची जागा सोडणार नसल्याचे राहुल गांधींनी याआधीच स्पष्ट केले होते. शिवाय गांधी परिवारासाठी अमेठीपेक्षा रायबरेली अधिक महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच राहुल यांना काँग्रेसने अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Letsupp Special : धंगेकर रिटर्न्सची म्हणूनच भाजपला भीती आहे

…तर प्रियांका गांधी रायबरेलीतून खासदार होणार?

अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यामागे काँग्रेसची आणखी एक रणनीती आहे. राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर विजयी झाल्यास त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. जर त्यांनी दोन्ही पैकी एक जागा सोडली तर, तेथून पर्यायी उमेदवार म्हणून प्रियंका गांधी उपलब्ध होतील आणि पोटनिवडणूक लढवून त्या खासदार होऊ शकतील अशी रणनीती काँग्रेसची आहे. वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधी विजयी झाल्यास प्रियांका गांधींसाठी रायबरेलीची जागा राहुल गांधी सोडू शकतात अशी दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

follow us

वेब स्टोरीज