Download App

‘मविआ’ जास्तीत जास्त जागा जिंकेल; कॉंग्रेस प्रभारीचं जागावाटपाबाबतही सूचक वक्तव्य, म्हणाले…

  • Written By: Last Updated:

Ramesh Chennithala on BJP : देशासमोर धर्मांधशक्तीचे मोठे आव्हान असून येत्या निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल. या मनुवादी शक्ती जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे, संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव वाढावा, यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली व आता मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyaya Yatra) सुरू आहे. आगामी निवडणुका देशातील लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चांगले वातावरण असून लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवू, असा विश्वास प्रभारीमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी व्यक्त केला आहे.

बिहारपाठोपाठ आंध्र-प्रदेशचाही मोठा निर्णय : लोकसभा निवडणुकीपूर्वीच ‘मास्टर स्ट्रोक’ 

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे विभागीय आढावा बैठका सुरू आहेत. आज पूर्व विदर्भाची आढावा बैठक गडचिरोलीत झाली. यावेळी चेन्निथला प्रसारमाध्यमांशी बोलत होते, ते म्हणाले की, आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी या आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या निवडणुका देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात एकत्र लढण्याची गरज आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहे. देशात शांतता, सौहार्द आणि सद्भावना राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भाजप रामाच्या नावावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे आरक्षणावरून समाजामध्ये समाजा-समाजात भांडणे लावत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, सामाजिक सद्भाव हे मुद्दे महत्त्वाचे असून काँग्रेस पक्ष निवडणुकीत या मुद्द्यांवर भर देणार आहे. जागावाटपाबाबत दिल्लीत बैठक झाली असून लवकरच दुसरी बैठक होणार असून त्यानंतर जागावाटपाबाबत निर्णय होणार आहे.

‘लोकसभे’साठी नितीश कुमारांचा नवा ‘डाव’; राष्ट्रीय कार्यकारिणीत ‘या’ खास शिलेदारांची एन्ट्री ! 

लोणावळ्यात काँग्रेसचे महत्वाचे शिबिर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे शिबीर लोणावळा येथे १७ व १८ फेब्रुवारीला आयोजित केले असून या शिबाराचे उद्घाटन खासदार राहुल गांधी ऑनलाईन करतील व समारोप राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे करणार आहेत. या शिबिराला राज्यातील ३०० महत्वाचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस व मविआसाठी राज्यात चांगले वातावरण..
कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने तोडफोड करून सरकार स्थापन केले, पण जनतेने निवडणुकीत भाजपचा पराभव करत पुन्हा काँग्रेस पक्षला बहुमताने विजयी केले. महाराष्ट्रातही ईडी, सीबीआयचा गैरवापर करून पक्ष फोडून सरकार स्थापन केले आहे. येत्या निवडणुकीत कर्नाटकप्रमाणे जनता भाजपला जागा दाखवून देईल. चेन्निथला म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून काँग्रेस आणि महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकेल.

या आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व CWC सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे आदी उपस्थित होते.

follow us

वेब स्टोरीज