‘…तर सरळ गुन्हा दाखल करून अटक करेल’; भारत जोडो न्याय यात्रा आसामध्ये दाखल होताच CM सरमांचा इशारा

  • Written By: Published:
‘…तर सरळ गुन्हा दाखल करून अटक करेल’; भारत जोडो न्याय यात्रा आसामध्ये दाखल होताच CM सरमांचा इशारा

Himanta Biswa Sarma On Bharat Jodo Nyaya Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyaya Yatra) नागालँडमधून आसाममध्ये पोहोचली आहे. भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये दाखल झाल्यानंतरराहुल गांधी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. या राज्यात देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आणि सर्वाधिक भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Chief Minister Himanta Biswa Sarma) यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

मोठी बातमी! बोट बुडाल्याने 12 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांचा मृत्यू, वडोदऱ्यातील दुर्घटना 

दरम्यान, शिवसागर जिल्ह्यातून सुरू झालेली ही यात्रा आसामच्या १७ जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यात गुवाहाटी शहराचाही समावेश करण्यात आला असून यामुळं राजकारण पेटलं आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी (18 जानेवारी) स्पष्ट केले की, आम्ही शहरात प्रवेश करण्याची परवानगी देणार नाही.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आसामचे सरमा म्हणाले, आम्ही सांगितले आहे की, शहरांमधून जाऊ नका. जो कोणता पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याची परवानगी दिली जाईळ. पण शहरांमधून जाण्याचा अट्टाहास केला तर आम्ही पोलीस व्यवस्था लावणार नाही. मी थेट गुन्हा दाखल करेन आणि निवडणुकीनंतर अटक करेन. सध्या काहीही कऱणार नाही, असं ते म्हणाले.

Solapur : असंघटीत कामगारांची गृह स्वप्नपूर्ती! 30 हजार गृह प्रकल्पाचं PM मोदींच्या हस्ते उद्घाटन 

पुढे बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ही न्याय यात्रा नाही, तर मियाँ यात्रा आहे. जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे त्यांची ही यात्रा सुरू आहे. यावेळी त्यांनी गांधी कुटुंबावर वैयक्तीक हल्लाही केला. सरमा म्हणाले, माझ्या मते देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब म्हणजे गांधी कुटुंब आहे. बोफोर्सपासून भोपाळ गॅस दुर्घटनेतील आरोपी पळवण्यापर्यंत त्यांचाच हात आहे. हे कुटुंब देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. हे केवळ भ्रष्टच नाही तर डुप्लिकेटही आहे. त्यांच्या घराण्याचे नावही गांधी नाही, आपलं डुप्लिकेट नाव घेऊन ते फिरत आहेत.

राहुल गांधी काय म्हणाले?
नागालँडमधून यात्रा आसाममध्ये दाखल झाल्यानंतर शिवसागर जिल्ह्यातील लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) टीका केली. ते द्वेष पसरवत जनतेचा पैसा लुटत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार आसाममध्ये आहे. आसाममध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. हिमंता बिस्वा सरमा यांचे यांचे संपूर्ण कुटुंब भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप राहुल यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube