मोठी बातमी! बोट बुडाल्याने 12 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांचा मृत्यू, वडोदऱ्यातील दुर्घटना

  • Written By: Published:
मोठी बातमी! बोट बुडाल्याने 12 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांचा मृत्यू, वडोदऱ्यातील दुर्घटना

Vadodara Harni Lake : गुजरातमधील वडोदरा (Vadodara Harni Lake ) येथे एक मन सुन्न करणारी मोठी दुर्घटना घडली आहे. दोन शिक्षकांसह 12 विद्यार्थ्यांचा बडून मृत्यू झाला आहे. हरणी तलावाबोट उलटल्याने (Boat Accident) हा अपघात झाला. हे विद्यार्थी शाळेच्या सहलीला गेले होते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बोटीत 23 मुले आणि चार शिक्षक प्रवास नौकाविहार करत होते.

Solapur : असंघटीत कामगारांची गृह स्वप्नपूर्ती! 30 हजार गृह प्रकल्पाचं PM मोदींच्या हस्ते उद्घाटन 

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. हरणी तलावात मुलांचा बुडून मृत्यू झाला ही दुःखद घटना आहे. ज्या मुलांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना या संकटातून बाहेर पडण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना पटेल यांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवर 4 शिक्षकांसह 23 विद्यार्थी होते. मात्र, बोट उलटल्याने 12 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर बोटीवरील 2 शिक्षकांचाही मृत्यू झाला आहे. हरणी तलावात बोटिंग करताना हा अपघात झाला. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. 13 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात यश आलं आहे.

दिवंगत विनायक मेंटेच्या पक्षात उभी फूट : भावाची नव्या राजकीय वाटचालीची घोषणा 

वडोदराच्या महापौर पिंकी सोनी यांनी सांगितले की, हे विद्यार्थी शाळेच्या सहलीवर आले होते. न्यू सनराईज स्कूलचे हे विद्यार्थी होते. एका खासगी बोटीत हे विद्यार्थी आणि शिक्षक बसले होते. मात्र अचानक बोटी पलटली आणि ती बुडाली.वडोदरा येथील यावेळी मुलांनी किंवा शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातले नव्हते. बोट उलटताच सर्वजण बुडाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत बारा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. तसेच दोन शिक्षकांचाही मृत्यू झाला. मात्र, एकूण 15 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. बोटीत 16 पर्यटकांना बसण्याची परवानगी देण्यात आली, मात्र, 27 जण बसले, असे जिल्हाधिकारी ए.बी. गौर यांनी सांगितले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube