Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आल्या (Lok Sabha 2024) आहेत. राज्यात ज्या मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू आहे त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघही आहे. या मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांनी तशी इच्छा व्यक्तही केली आहे. यामध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एन्ट्री घेतली आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी या मुद्द्यावर उदय सामंत यांना चांगलेच फटकारले. आम्हीच ओरिजिनल आहोत. कुठूनही आलो असलो तरी आता भाजपमध्ये आहोत. उगाच आमचं तुमचं करू नका, युतीचं पावित्र्य राखा, अशा शब्दांत मंत्री राणे यांनी सामंतांना सुनावलं.
Maharashtra Politics : CM शिंदेंना धक्का! मंंत्री सामंतांचा भाऊ ठाकरे गटाच्या वाटेवर ?
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे. उमेदवार कोण असेल हे आमचा पक्ष नंतर ठरवेल. त्यामुळे उदय सामंत यांनी या मुद्द्यावर भाष्य करूच नये. उदय सामंत बोलतील तसंच होईल असं काहीच सांगता येत नाही. आम्हीच ओरिजिनल आहोत. कुठूनही आलो असलो तरी आता भाजपमध्ये आहोत. उगाच आमचं तुमचं करू नका. एकदा मंगळसूत्र घातलं ना आता युतीचं पावित्र्य ठेवायचे, असे राणे म्हणाले. राणे यांनी ठाकरे गटावरही जोरदार टीका केली. ठाकरेंना आता काही काम राहिलं नाही. उबाठावाल्यांनी आयुष्यात टीका करण्यापलीकडं काहीच केलं नाही. उबाठा आता संपली आहे, अशी टीका मंत्री राणे यांनी केली.
शिंदे गट-भाजपात धुसफूस वाढली
दरम्यान, किरण सामंत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत चार वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या विजयात किरण सामंत यांचा मोठा वाटा आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या राजकारणात ते सक्रिय आहेत. या मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. ते स्वतः व्यावसायिक आहेत. आजपर्यंत त्यांनी कोणतेही पद घेतले नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी विरोधी भूमिका घेत ठाकरे गटात जाण्याचे संकेत दिले होते. नंतर मात्र त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. परंतु, सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ लढण्यासाठी भाजप सुद्धा आग्रही आहे. त्यामुळेच अस्वस्थ झालेल्या किरण सामंत यांनी काही दिवसांपूर्वी वेगळी वाट करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! पक्ष अन् चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर