Tanaji Sawant On Archana Patil : धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आयोजित सभेत बोलतांना महायुतीच्या नेत्यांनी अर्चना पाटील यांनी विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलतांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी माझ्या बहिणीसाठी मी छातीचा कोट करेन, आणि मोठ्या लीडने विजयी करणार, असा विश्वास व्यक्त केला.
Dharashiv Lok Sabha : माझ्या बहिणीसाठी मी छातीचा कोट करेन : तानाजी सावंत
महायुतीतर्फे अर्चना पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करतांना सावंत म्हणाले की, धाराशिवच्या या जागेवर जानेवारी महिन्यातच प्रचार सुरू झालेला आहे. २६ जानेवारीपासून प्रचाराला धनजंय सावंत यांनी सुरुवात केली आहे. हा मतदार पारंपारिक पद्धतीने कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे. शिवसेनेचा बाणा या मतदारसंघात आहेत. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आला.अशाच पद्धतीने माझ्या शिवसेनेचा एकेक मतदारसंघ असाच कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः हे सहन करणार नाही, असा इशारा सावंत यांनी दिला.
छगन भुजबळांनी मैदान सोडल, लोकसभा निडणुकीतून माघार; वाचा नक्की काय घडल?
पुढं बोलतांना सावंत म्हणाले की, समोरच्याचा फडशा पाडण्यासाटी महायुतीच्या व्यासपीठावर आम्ही येऊ. पण, हा लोकसभा मतदारसंघ पारंपारिक शिवसेनेचा आहे. येथील खासदार आठ वेळा शिवसेनेचे राहिले आहेत. हा माझ्या तमाम शिवसैनिकांवर अन्याय आहे. मात्र, विश्वनेता नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला अर्चना पाटील यांना लीड देऊन विजयी करायचं, असं आवाहन सावंत यांनी केलं.
ते म्हणाले, वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात, त्यावेळी त्या त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या बहिणीसाठी मी छातीचा कोट करून उभा असेल, असंही सावंत म्हणाले.