Download App

माढ्यात पवारांची फडणवीसांवर मात! उत्तम जानकरांचा शरद पवार गटात प्रवेश

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Uttam Jankar Join Sharad Pawar Party : गेल्या काही दिवसांपासून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले धैर्यशील मोहिते-पाटी (Dhairyashil Mohite Patil) आणि उत्तम जानकर (Uttam Jankar) हे हातमिळवणी करणार असल्याची चर्चा रंगली होती. जानकरांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं ते शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करतील, अशी शक्यता होती. दरम्यान, आज त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Chandrababu Naidu : माजी मुख्यमंत्र्यांकडे 810 कोटींची संपत्ती, गेल्या पाच वर्षात 41 टक्क्यांनी वाढ 

माळशिरसमध्ये मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, मोहिते-पाटील आणि जानकर हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले. त्यामुळं मोहिते पाटील कुटुंबीय आणि उत्तम जानकर यांच्यातील 30 वर्षांचे वैर संपुष्टात आलेत. मोहिते पाटलांना उत्तम जानकरांचे मन वळण्यात यश आलं. जानकर मोहिते पाटलांना लोकसभा निवडणुकीत मदत करतील. त्यानंतर मोहिते पाटील हे उत्तम जानकर यांना विधानसभेत मदत करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Lok Sabha Election : लंकेंना उमेदवारी देऊ नका, या विनंतीसाठी विखेंनी उद्योजक पाठवला होता : पवारांचा मोठा गौप्यस्फोट 

आधी मोहिते-पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर आता 2019 मध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा देणाऱ्या उत्तम जानकरांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळं भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, माढ्यात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचा सामना भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकरांशी आहे. आता जानकरांची मोहिते पाटलांना साथ मिळाल्यानं मोहिते पाटलांना माळशीरसमधून दीड लाखांपर्यंत लीड मिळेल, असा विश्वास जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला होता.

भाजपचा प्रयत्न फसला
देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी जानकरांना आमदारकीचे आश्वासनही दिले होते. ऑगस्टमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तेव्हा तुम्हाला आमदार करू, ही फडणवीसांची ऑफर जानकरांना धुडकावून लावली. त्यामुळं जानकरांना आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न फसला.

 

follow us

वेब स्टोरीज