Download App

नितीनजी हवेत की दुसरा उमेदवार? निरीक्षकांची विचारणा; गडकरींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह!

  • Written By: Last Updated:

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपने (BJP) पहिल्या यादीत १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पण, यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) नाव नसल्याने अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत गडकरी हवेत की दुसरा उमेदवार? अशी विचारणा भाजप निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली. यावेळी सर्वांनी गडकरी हेच आमचे नेते आणि उमेदवार असल्याचे ठणकावून सांगितले.

‘आर्टिकल 370’चा जगभरात डंका, यामीच्या सिनेमाने पार केला 50 कोटींचा गल्ला 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत नितीन गडकरी यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत असेल, असे बोलले जात होते. मात्र, असं झालेले नाही. या यादीत इतर नेत्यांची नावे आहेत, मात्र गडकरींच्या नावाचा समावेश नाही. आता वेगळीच माहिती समोर आली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मतदारसंघनिहाय लोकसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. खासदार मनोज कोटक आणि माजी आमदार अमर साबळे यांच्याकडे नितीन गडकरी यांच्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते मतदारसंघात जाऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. यासोबतच ते उमेदवारांविषयी स्थानिकांची मतदही जाणून मतेही घेत आहेत.

जादा परताव्याचं आमिष दाखवून कोट्यावधींचा गंडा, एजंट पैसे घेऊन पसार, गुंतवणूकदारांमध्ये घबराट

दोन दिवसांपूर्वी (गुरुवारी) निरीक्षक मनोज कोटक आणि अमर साबळे नागपुरात होते. यावेळी त्यांनी मतदारसंघातील पक्षाचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

भाजपची निवडणूक तयारी, उमेदवाराबाबतचे मत, विजयाची शक्यता आदी माहिती घेतली. यावेळी निरीक्षकांनी ‘नितीन गडकरींना उमेदवारी द्यावी की अन्य कोणाला’ असा सवाल केला.

अनेकदा गडकरी यांच्या उमेदवारीबाबत वेळोवेळी साशंकता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर निरीक्षकांनी उमेदवाराबाबत त्यांचे मत जाणून घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ते दहा वर्षे केंद्रीय मंत्री आहेत. नागपुरातून सलग दोनदा लोकसभा जिंकली. असे असतानाही त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अनेकांना आवडले नाही.

गडकरी यांची कामगिरी संपूर्ण देशाला ठाऊक आहे. त्यांचा संपर्क, त्यांना असलेला जनतेचा पाठिंबा, त्यांनी केलेली विकासकाम याविषयी विरोधकांनाही शंका नाही. त्यामुळे हा प्रश्चच नागपूरमध्ये उपस्थित होत नाही, असं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून पक्षातील अनेकांना धक्का दिला. यात माजी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली, केंद्रीय राज्यमंत्री जॉन बारला यांची तिकिट भाजपने कापली. गडकरीचंही तिकीट कापलं. अशातच गडकरी हवेत की, अन्य उमदेवार अशी विचारणा केल्यानं भाजपच्या मनात गडकरींविषयी काय नक्की काय आहे, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us