सध्या आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमी नाही, मात्र ओरिजनल गिऱ्हाईक…नितीन गडकरींचे सूचक वक्तव्य

  • Written By: Published:
सध्या आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमी नाही, मात्र ओरिजनल गिऱ्हाईक…नितीन गडकरींचे सूचक वक्तव्य

बुलडाणाः केंद्रीय मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमीच वेगवेगळ्या विधानामुळे चर्चेत येत असतात. आता भाजप (BJP) पक्ष मोठा झाला आहे. अनेक नवे नेते भाजपमध्ये येतायत. त्याचा धागा पकडून नितीन गडकरी यांनी बुलडाणा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना एक मोठे वक्तव्य केले आहे. आता आमचे दुकान चांगले सुरू आहे. तसेच सध्या आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमी नाही. मात्र ओरिजनल (जुने) गिऱ्हाईक दिसेना, असे सूचक वक्तव्य गडकरी यांनी केले आहे.

&शरद पवार गटाचं टेन्शन वाढलं! सुनिल तटकरेंनी मंत्र्यांवर सोपवली मोठी जबाबदारी…

गडकरी म्हणाले, विचारासाठी, देशासाठी, समाजासाठी अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे. पण जेव्हा दुकान चालायला लागते. तेव्हा गिऱ्हाइकांची कमी नसते. आता आमचे दुकान चांगले चालू आहे. गिऱ्हाईकांची कमी नाही. पण ओरिजनल (जुने) गिऱ्हाइक दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणारा ‘सहकारा’चा अध्यादेश अखेर मागे

आज आपण जे आहोत. ते नेहमीच माझ्यासारख्या लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे. आजचा दिवस पाहिला मिळाला तो केवळ आमच्या कर्तृत्वामुळे नाही. तर असंख्य, लाखोंच्या कार्यकर्त्यांमुळे हे दिवस पाहिले मिळाले आहे. हे कार्यकर्ते प्रवाहाच्या, सत्तेच्या विरोधात लढले. त्यांनी आणीबाणीत दोन-दोन वर्ष तुरुंगात काढले. अनेक आपत्त्या सहन केल्या. त्यांनी आंदोलनात लाठ्या खाल्ल्या आहेत. या अनेक लोकांच्या बलिदानामुळे, तपश्चर्यातून खऱ्या अर्थाने आम्ही सत्तेमध्ये पोहोचले आहोत, असे गडकरी म्हणाले.

गडकरी म्हणाले, सर्व जुन्या कार्यकर्त्यांमुळे आम्ही शिखरावर आहोत. जुन्या कार्यकर्त्यांनी गाडून घेतले. त्यांनी गाडून घेतले नसते, तर शिखरावर गेलो नसतो. त्यामुळे मी जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठी घेत असतो. कार्यकर्त्यांच्या बळावरच राजकारणात यशस्वी होता येते हे मी नेहमीच सांगत असते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube