Download App

“खासदार होऊन तु्मच्यापासून दूर गेलो, दोन महिन्यांनंतर इकडेच येतो”; सुजय विखेंच्या मनात काय?

Sujay Vikhe Speech in Rahata : शनिवारचा दिवस. शिर्डीजवळील राहता शहरात महिला बचतगटांना साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास भाजप खासदार सुजय विखे (Suay Vikhe) उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी असे एक वक्तव्य केले ज्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. ‘तुमच्या आशीर्वादाने मी नगरचा खासदार झालो. मात्र तुमच्यापासून दुरावला गेलो. माझे दोन महिने होऊ द्या नंतर मी कायमचा इकडेच येईन, काळजी करू नका’, असे विखे पाटील यांचे शब्द होते. आता त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय,  त्यांना नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी तिकीट मिळणार का, सुजय विखे शिर्डी विधानसभेतून लढणार का,  असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

Sujay Vikhe : आघाडीने 2024 चा नाद सोडला, त्यांची तयारी 2029 ची; विखेंचा खोचक टोला

आमच्यावर खूप काही आरोप झाले आहेत. पण, या आरोपांची उत्तरं मी दोन महिन्यांनंतर देईन. मला लोकसभेची व्यस्तता आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 37 व्या वर्षी खासदार झालो. काम करू शकलो. तुम्हीच तुमच्या आशीर्वादाने मला तुमच्यापासून लांब लोटलं. मी तिकडं (नगर दक्षिण) गेलो. त्यानंतर आज बऱ्याच महिन्यांनंतर मला तुमच्यात येण्यासाठी वेळ मिळाला. आता माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडेच येऊन जाईन काळजी करू नका.

तिकडचे लोकं प्रेम करतात त्यांना न्याय द्यायचाय आणि इकडचेही लोकं प्रेम करतात तर ह्यांनासुद्धा न्याय द्यायचाय. त्यामुळे दोन्हीकडे सारखंच काम करतोय. कुणी भ्रष्टाचाराचे तर कुणी विकासकामांबाबत आरोप करतात. आज मी येथे सत्कार का घेतला नाही याचं कारणही सांगतो. जे कार्यकर्ते जनतेची कामं करतील त्यांच्याच हातून मी सत्कार स्वीकारील असे सुजय विखे यावेळी म्हणाले.

Sujay Vikhe : मशाल घ्या, तुताऱ्या घ्या आणि वाजवा; खासदार विखेंची ठाकरे-पवारांवर टीका

सुजय विखे सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. आगामी निवडणुकीसाठीही त्यांनी तयारी सुरू केली आहे. परंतु, सध्या त्यांना पक्षांतर्गत विरोध वाढला आहे. भाजप आमदार राम शिंदे सातत्याने विखेंची कोंडी करत आहेत. मी सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहे हे त्यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्याबरोबर शिंदे सातत्याने दिसतात. या घडामोडी सुरू असताना महायुतीचा नगर दक्षिणेतील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.  यातच सुजय विखे यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

follow us

वेब स्टोरीज