Download App

आमदार संग्राम जगताप मंत्री होणार का? तटकरेंनी थेट नगरमधूनच सांगितलं फ्यूचर पॉलिटिक्स

आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात मंत्रि‍पदाची मागणी झाली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत नक्कीच पोहोचवू.

Sunil Tatkare Press Conference in Ahmednagar : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची मोठी (Lok Sabha Election) पिछेहाट झाली. राज्यात भाजपाच्या अनेक जागा कमी झाल्या. या धक्क्यातून सावरत महायुतीने डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी काही मंत्रिपदं मिळतील असं सांगितलं जात आहे. यातच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (Sangram Jagtap) मंत्रिपद मिळावं अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. या मागणीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी (Sunil Tatkare) उत्तर दिलं.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. याआधी नगर शहरात शरद पवार गटाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला होता. त्यानंतर आज नगरमधून अजित पवार गटाचे खासदार यांनी राज्याचा दौरा सुरू केला. या दौऱ्यानिमित्त सुनील तटकरे आज नगर शहरात आले होते. येथे एक छोटेखानी मेळावाही पार पडला. यानंतर पत्रकार परिषदेत तटकरे यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत मते व्यक्त केली.

लोकसभेचा वचपा काढण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुनील तटकरे उद्या नगरच्या दौऱ्यावर

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. या विस्तारात नगरला संधी मिळणार का? कार्यकर्त्यांकडून आमदार संग्राम जगताप यांच्या मंत्रिपदाची मागणी होत आहे असे विचारले. त्यावर तटकरे म्हणाले, नगरला आम्ही महत्व देतो हे खरंच आहे. नगरचं राजकीय महत्व महाराष्ट्रात आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित झालं. आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात मंत्रि‍पदाची मागणी झाली आहे. मला वाटतं  संग्राम जगताप एक तरुण कार्यकर्ते आहेत.

जगताप यांची ही दुसरी टर्म आहे तसेच त्यांच्या मतदारसंघातून त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत 31 हजारांचं मताधिक्य सुजय विखेंना दिलं आहे. त्यांचं संघटन कौशल्य आणि जनमानसातला प्रभाव त्यांनी दाखवला आहे. मंत्रि‍पदाबाबत अजून काहीच चर्चा झालेली नाही. पाहू या पुढं काय होतंय ते. पण, कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत नक्कीच पोहोचवू, अशा सूचक शब्दांत तटकरे यांनी उत्तर दिले.

फडणवीसांनी सरकारमध्ये राहावं

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबतही तटकरेंनी भाष्य केलं.  देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असले पाहिजेत. प्रशासनाचा त्यांना उत्तम अनुभव आहे. एकेकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा उपयोग महायुतीच्या विजयासाठी होईल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

Raigad Lok Sabha Result 2024: अजितदादांचा शिलेदार सुनील तटकरे घासून नाही ठासून विजयी झाला

त्यांनी 2019 मध्येच भाजपशी संपर्क केला होता

कर्जत जामखेडच्या आमदारांनी (रोहित पवार) 2019 मध्ये भाजपशी संपर्क साधला होता ते नेमकं काय होतं, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.  त्यांनी 2019 मध्ये भाजपाच्या एका खासदारामार्फत भाजप नेतृत्वाशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांना पुण्यातून उमेदवारी पाहिजे होती पण, भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. या सरकारमध्येही त्यांना (रोहित पवार) संधी मिळाली नाही. त्यामुळे राजीनामा देऊन ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढणार होते अशी माहिती त्यावेळी होती. हे मी याआधीही अनेकदा सांगितलं होतं, असे तटकरे म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज