Raigad Lok Sabha Result 2024: अजितदादांचा शिलेदार सुनील तटकरे घासून नाही ठासून विजयी झाला
Raigad Lok Sabha Result 2024 Sunil Tatkare Wins : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Result 2024) सातही टप्प्यात मतदान झाले असून आज मतमोजणीला सुरूवात झाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group) नेते अनंत गीते (Anant Geete) पराभूत झाले आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे विजयी झाले आहेत.
ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यावेळी मविआतर्फे ही जागा ठाकरे गटाच्या पारड्यात पडली होती. शिवसेना पक्ष फुटीनंतर मशाल चिन्ह घेऊन लढणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अनंत गीते यांना उमेदावरी दिली. तर त्यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आता त्यात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने ही जागा दोनदा काबीज केली होती.
रायगड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास
रायगड लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये कुलाबा लोकसभा मतदारसंघातून लांब झाला आहे. या मतदार संघात 2009 मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली. 15 लाख 32 हजारांहून जास्त मतदार असलेली ही जागा शिवसेनेने दोनदा पाणी पाजवले आहे. शिवसेनेने येथे पहिली आणि दुसरी निवडणूक जिंकली होती. रायगड लोकसभा मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खासदार आहेत.
सलग दोनवेळा या मतदारसंघातून खासदार राहिलेले अनंत गीते यांचा त्यांनी मोठा पराभव केला होता. रायगड लोकसभा जागेवर 2009 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चांगलीच चुरशीची लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये काँग्रेसने ए. आर. अंतुले तर शिवसेनेने अनंत गीते यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत अनंत गीते यांना 4,13,546 मते भेटली होती. त्यांनी ही निवडणूक 1,46,521 मतांनी जिंकली. तर काँग्रेसचे ए.आर. अंतुले यांना 2,67,025 मते मिळाली. 2014 च्या निवडणुकीतही शिवसेनेने अनंत गीते यांना तिकीट देऊन पुन्हा विजयाची पुनरावृत्ती झाली होती.
तसेच 2014 मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांनी कांटे की टक्कर दिली. अनंत गीते यांचा केवळ 2110 मतांनी विजय झाला. त्यांना 3,96,178 मते मिळाली. तर सुनील तटकरे यांना 3,94,068 तर शेकापचे उमेदवार भाई रमेश कदम यांना 1,29,730 मते मिळाली. 20,362 मतदारांनी नोटा बटण दाबले. पण 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी गेल्या निवडणुकीचा बदला घेत शिवसेनेच्या अनंत गीते यांचा 31,438 मतांनी पराभव केला. त्यांना 4,86,968 तर गीते यांना 4,55,530 मते मिळाली होती.
अमरावतीत नवनीत राणांचा पराभव, कॉंग्रेसच्या बळवंत वानखडेंनी दाखवला इंगा
रायगड लोकसभा मतदारसंघात 58.10 टक्के मतदान
रायगड लोकसभा मतदारसंघात आधीच्या तुलनेते यंदा यावेळी मतदान घटलं. यावेळी 58.10 टक्के मतदानाची नोंद झाली. 2019 सालच्या तुलनेत हे मतदान 7 टक्के कमी झालं. 2019 ला रायगड लोकसभा मतदार संघात 65.06 टक्के मतदान झालं होते. मात्र यंदा मतदान मोठ्या प्रमाणात घटला होता, यामुळे याचा नेमका फटका कोणाला बसतो, याची देखील चांगलीच चर्चा सुरू होती.