राजूल पटेलांचा शिंदे गटात प्रवेश होताच परबांचा इशारा; म्हणाले, 24 तासात शाखा खाली करा, अन्यथा..

  • Written By: Published:
राजूल पटेलांचा शिंदे गटात प्रवेश होताच परबांचा इशारा; म्हणाले, 24 तासात शाखा खाली करा, अन्यथा..

Shiv Sena Thackeray Group vs Shinde Group : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वर्सोवा येथील शिवसेनेच्या महिला नेत्या व माजी नगरसेवक राजूल पटेल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता ‘मी मार खाऊन ती शाखा बांधली आणि वाचवली, (Thackeray ) असं आमदार अनिल परब यांनी म्हटलं आहे ती ताब्यात घेणार असं ते म्हणालेत.

शाखा तातडीने खाली करायची

येत्या 24 तासाच्या आत ही शाखा खाली करावी अन्यथा शाखा ताब्यात घेऊ, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. राजुल पटेल या शाखेमध्ये काम करत होत्या ती शाखा ठाकरेंच्या शिवसेनेची आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ती शाखा तातडीने खाली करावी असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे. तर, उद्धव ठाकरेंचे खास व माजी मंत्री अनिल परब यांनी थेट इशारा देत ती शाखा आम्ही ताब्यात घेणार असल्याचं म्हटलं आहे.

ठाकरेंना धक्का! अहिल्यानगरचे पदाधिकारी करणार जय महाराष्ट्र; मुहूर्तही ठरला

ती शाखा आम्ही ताब्यात घेणार, मी मार खाऊन ती शाखा बांधली आणि वाचवली आहे. कोर्टात जाऊन ती शाखा आम्ही ताब्यात घेतली होती. फक्त नगरसेविका राजूल पटेल होत्या म्हणून त्यांना ती शाखा दिली होती. या शाखेची कागदपत्रे त्यांच्या नावावर होती, आता ती आम्ही ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना सांगितलं आहे, अशा शब्दात वर्सोव्यातील शिवसेना शाखा 61 बाबत अनिल परब यांनी जुन्या आठवणी व शिवसेनेचा इतिहास सांगितला.

तेव्हा निवडणुका होतील

सर्वोच्च न्यायालय जेंव्हा सरकारला वाटेल निवडणुका घ्यायचं तेंव्हा निर्णय देईल. सत्ताधारी अभ्यास करत आहेत, जेंव्हा अभ्यास पूर्ण होईल तेंव्हा निवडणुका घेतील. पण, आम्हाला फक्त निवडणुकांना समोर जायचं आहे, असे म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याबाबतही परब यांनी भाष्य केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube