Download App

निकालापूर्वीच प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; मविआ-महायुतीमध्ये कोणाशी युती करणार? म्हणाले, ‘सरकारमध्ये राहणार…’

  • Written By: Last Updated:

Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar MVA Vs Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election Result 2024) निकाल उद्या शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर होणार आहेत. त्याआधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. जे सरकार स्थापन होईल, त्या बहुमताला पाठिंबा देऊन एकत्र येऊ, मग ते महाविकास आघाडी असो वा महायुती, असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निकाल काही तासांवर येवून ठेपलाय. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं एक वक्तव्य समोर (MVA Vs Mahayuti) आलंय. जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Exit Poll : जनतेच्या मनातला CM कोण? शिंदे, फडणवीस, दादा की नाना? आश्चर्यकारक माहिती..

शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी राज्यात मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल उद्या स्पष्ट होणार आहे. वंचित बहुजन आघाडी या वेळी अनेक ठिकाणी जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सत्तेत जाणार असे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ‘X’ या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत म्हटलंय आहे.

राज्यात पुन्हा महायुती सरकार, टुडेज चाणक्य अन् ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज काय?

यावेळी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते. यावेळी अनेक छोटे पक्ष आणि बंडखोर देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता हे घटक कोणाला पाठिंबा देणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद मुंबई, नाशिक आणि मराठवाडा या भागात दिसून येते. आपला पक्ष राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आवाज बनेल, असा दावा या पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे.

 

follow us