Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Loksabha Election) उमदेवारांची दुसरी यादी भाजपकडून नूकतीच जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये भाजपकडून यंदा काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विविध मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडून धक्का दिला असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये विशेषत: उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रीतम मुंडे तर उत्तर पूर्वचे मनोज कोटक यांचा पत्ता कट करुन धक्का दिला असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्रिपदानंतर आता आमदारकीचाही राजीनामा, मनोहर लाल खट्टर यांची पुढची खेळी काय?
मागील काही दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अशातच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर दिल्लीत बैठकीतील चर्चेअंती भाजपकडून आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीनूसार भाजपने विद्यमान खासदारांऐवजी कुटुंबातील इतर सदस्यांना संधी दिली आहे. तर इतर मतदारसंघातून नवीन चेहऱ्यांना लोकसभेत उभे करण्याचा डाव भाजपने आखला आहे.
‘शिवतारेंचं वक्तव्य संतापजनक, CM शिंदेंनी त्यांना समज द्यावी’; इतिहास सांगत तटकरेंनी फटकारलं
सलग दोनवेळा लोकसभेत गेलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रितम मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. हा प्रितम मुंडे यांच्यासाठी एक प्रकारचा धक्काच मानला जात आहे. तर प्रितम मुंडेंना उमेदवारी नाकारुन भाजपने त्यांचीच बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दुसऱ्या यादीनूसार मुंबईत भाजपच्या अनेक विद्यमान नेत्यांना डावलल आहे. भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे.
‘रामायण’मध्ये रणबीरच्या ‘राम’ भूमिकेबद्दल अरुण गोविल थेटच म्हणाले, ‘तो संस्कारी मुलगा…’
उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनोज कोटक यांचं तिकीट भाजपकडून कापण्यात आलं आहे. मनोज कोटक यांच्याजागी महिरी कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईत मोठी घडामोड घडणार असल्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली होती. त्यानूसार भाजपकडून मुंबईतील भाजप नेत्यांसाठी धक्कातंत्रच वापरलं गेलं असल्याचं बोललं जात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातही भाजपकडून संजय धोत्रे यांच्यऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट दिलं आहे.
दरम्यान, जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना तिकीट दिलं आहे. तर अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट दिलं आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला आहे.