Sharad Pawar NCP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिसरी यादी जाहीर केली. या यादीत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्याात आली आहे. तर रावेर मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. सातारासाठी आधी खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांनी माघार घेतली होती. त्यामुळे आता शरद पवार कुणाला संधी देणार याबाबत चर्चा सुरू होती. अखेर या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार' पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि… pic.twitter.com/XUHuXOh88P
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 10, 2024
शरद पवार गटाने पहिल्या यादीत बारामती, शिरुर, अहमदनगर दक्षिण, दिंडोरी आणि वर्धा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत बीड आणि भिवंडी मतदारसंघांसाठी उमेदवार घोषित केले. त्यानंतर आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत साताऱ्यासाठी शशिकांत शिंदे आणि रावेरसाठी श्रीराम पाटील यांची नावे आहेत.
रावेर मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून एकनाथ खडसे किंवा त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरुवातीला होती. परंतु, या दोघांनीही नकार दिला. आतातर एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार या मतदारसंघात कुणाला संधी देणार याची चर्चा होती.
मोठी बातमी! महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घोषित; काँग्रेस 17, राष्ट्रवादी 10 शिवसेना 21 जागा लढणार
या चर्चा आता थांबल्या आहेत. श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता या मतदारसंघात रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत होणार आहे. शरद पवार गटाने आतापर्यंत नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार गट दहा जागा लढणार असल्याचे सांगण्यात आले होते. आणखी एका मतदारसंघात उमेदवारी घोषणा होणे बाकी आहे.
असा आहे मविआचा फॉर्म्युला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती , शिरूर, सातारा , भिवंडी ‘ माढा, रावेर आणि अहमदनगर दक्षिण या जागा लढणार आहे. तर शिवसेना जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, हातकणंगले, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई या जागा लढणार आहे.
काँग्रेस पक्ष नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रावेर, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई 17 जागा लढणार आहे.