गृहमंत्री फडणवीसच जबाबदार.. देशपांडेंवर हल्ला म्हणजे कायदा सुव्यस्थेचे बारा; अंधारेंचा हल्लाबोल

Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या प्रकारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाण साधला आहे.  वाचा : kasba Bypoll Result : हा खऱ्या शिवसेनेशी बेईमानी केल्याचा परिणाम; […]

Sushma Andhare

Sushma Andhare

Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या प्रकारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाण साधला आहे.

 वाचा : kasba Bypoll Result : हा खऱ्या शिवसेनेशी बेईमानी केल्याचा परिणाम; सुषमा अंधारेंचा भाजपला टोला 

अंधारे म्हणाल्या, की संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची घटना निंदनीय आहे. त्याचा सर्वांनीच निषेध केला पाहिजे. जर लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांवर असे हल्ले होत असतील तर सर्वसामान्य माणसांचे काय ?, असेच प्रकार होत असतील तर याचा अर्थ कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पकड ढिली होत आहे का, याचा विचार करण्याची गरज असल्याचे अंधारे म्हणल्या. मला वाटते की या हल्ल्यांच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याला सर्वस्वी जबाबदार गृहमंत्री फडणवीस आहेत, असे अंधारे म्हणाल्या.

हे तर भाजपचे दबावतंत्र.. कसब्यातील ‘त्या’ प्रकारावर सुषमा अंधारे संतापल्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी क्रिकेटते स्टम्पच्या सहाय्याने हा हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हातापायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील देशपांडे यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Exit mobile version