हे तर भाजपचे दबावतंत्र.. कसब्यातील ‘त्या’ प्रकारावर सुषमा अंधारे संतापल्या

हे तर भाजपचे दबावतंत्र.. कसब्यातील ‘त्या’ प्रकारावर सुषमा अंधारे संतापल्या

पुणे : कसबा पेठ (kasbaPeth Bypoll )मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या विजयाचे बॅनर निकालाआधीच झळकले. या प्रकारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, की खरे तर या प्रकाराची दखल भाजप आणि निवडणूक आयोग या दोघांनीही घेतली पाहिजे. कारण, निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत जो निकाल दिला आहे. त्यामुळे आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. तरी सुद्धा हेमंत रासने विजयी झाल्याचे बॅनर झळकणे म्हणजे उरलीसुरली विश्वासार्हता संपविणारी बाब आहे.

वाचा : Kasba Bypoll Election : भाजपा उमेदवार रासनेंनंतर मविआचे रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल

हा प्रकार म्हणजे, एका अर्थाने तुम्ही निवडणूक प्रक्रियेवर दबाव आणत आहात का, भाजप निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव तंत्र निर्माण करत आहे का, लोकांनी कुणालाही मतदान केलेले असो पण तुम्हाला रासनेंच्याच बाजूने निकाल द्यायचा हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे का असे सवाल त्यांनी केले. मला वाटते, की हे लोकशाहीची हेटाळणी करणारी गोष्ट आहे. मग मतदान तरी कशाला घेतले तुम्हाला मतदान मोजायचेच नसेल तर असेही त्यांनी सुनावले.

Kasba Chinchwad Bypoll : संजय राऊतांनी व्यक्त केली वेगळीच भीती; म्हणाले, हा तर त्यांचा प्रशासनावर..

दरम्यान, कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. त्यानंतर आता 2 मार्च रोजी निकाल लागणार आहे.या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube