kasba Bypoll Result : हा खऱ्या शिवसेनेशी बेईमानी केल्याचा परिणाम; सुषमा अंधारेंचा भाजपला टोला

kasba Bypoll Result : हा खऱ्या शिवसेनेशी बेईमानी केल्याचा परिणाम; सुषमा अंधारेंचा भाजपला टोला

kasba Bypoll Result : कसबा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली.

वाचा : kasba By Poll Result : रवींद्र धंगेकर विजयी; भाजपला धूळ चारली

अंधारे म्हणाल्या, की ‘कसबा मतदारसंघात धंगेकरांचा विजय म्हणजे जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला हा विजय आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमताचा कौल वाढत चालला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीला आणखी बळ मिळाले आहे. भारतीय जनता पार्टीबरोबर (BJP) जो पर्यंत खरी शिवसेना (Shivsena) होती. त्यांच्याबरोबर जोपर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नाव होते. तोपर्यंतच त्यांना कसब्यात (kasba Bypoll Result) विजयाची खात्री होती. ज्या क्षणी त्यांनी शिवसेनेबरोबर बेईमानी केली त्याक्षणी ही खरी शिवसेना महाविकास आघाडीच्या बाजूने उभी राहिली आणि आज त्याची परिणिती धंगेकरांचा विजय आहे.

Pune By-Poll Results 2023 : अश्विनी जगतापांना मोठी आघाडी, जल्लोषासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

कसबा निवडणुकीत धंगेकरांनी विजय मिळवला. या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. गेली अनेक वर्षे या येथून भाजपचाच उमेदवार निवडून येत होता. यावेळी मात्र तशी परिस्थिती नव्हती. भाजपालही याचा अंदाज होता.  त्यामुळे सुरुवातीपासूनच भाजपने येथे विशेष खबरदारी घेतली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांसह स्वतः आजारी असतानाही खासदार गिरीश बापट यांनीही प्रचार केला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही येथे मोठ्या प्रचार सभा घेतल्या. त्यामुळे कोण विजयी होणार, याची चर्चा होती. निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र धंगेकर विजयी झाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube