Sadabhau Khot : सध्या टोमॅटोचे भाव प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचा त्रास वाढला आहे. या वाढलेल्या दरावरून आता राजकारण सुरू झाले असून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. टोमॅटो मिळाले नाहीत म्हणून कुणी टाचा खोरून मेले का, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. टोमॅटो काय करताय सिलिंडर महाग झालाय त्यावर अनुदान देण्याची मागणी सरकारकडे करा, असेही खोत यांनी सांगितले.
किंमती वाढल्या म्हणून ओरड करणार्या सर्वसामान्य नागरिकांना खोत यांनी चांगलेच फटकारले. टोमॅटो आत स्वीस बँकेत ठेवण्याची गरज आहे. रयत क्रांती संघटनेने महाविकास आघाडी सरकारच्या काळात दूध व बैलगाडी आंदोलन केले होते. आता आमचे सरकार असतानाही 22 मे रोजी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यात्रा काढली.
‘आमदारांंच्या कोटाची साईज बदलली, तरीही मंत्रीपद नाही’; राऊतांची खोचक टीका
टोमॅटो काही अणुबॉम्ब नाही. दोन तीन महिने कळ काढा. त्यानंतर ज्या कोणाला टोमॅटो लागतात त्याला सरण रचण्यासही टोमॅटो देऊ. मग सरणासाठी लाकडेच वापरू नका, फक्त टोमॅटोच वापरा, असे खोत म्हणाले.
मी याआधी सुद्धा कांदा परवडत नसेल तर टोमॅटो खा असे म्हणालो होतो. आता टोमॅटो नाही तर कांदा खा, असा सल्ला देतो. शेतकऱ्यांची वस्तू महागली की त्याच्या नावाने अशी ओरड करता. अशामुळे शेतमालाची माती होईल. मागील वर्षात टोमॅटोचे भाव खूप कमी झाले होते त्यावेळी कुणी काही बोलले नाही अशी आठवणही खोत यांनी करून दिली.
दोन पैसे वाढले असतील, गावगाड्यातील शेतकऱ्याला मिळत असतील तर काय हरकत आहे. जो किलोभर टोमॅटो पाच माणसांना लागत असेल त्यांनी अर्धा किलोवर या. अर्धा किलो लागत असेल तर त्यांनी पावशेरवर या आणि ज्यांना परवडत नसेल त्यांनी दोन तीन महिने टोमॅटो खाऊ नका. टोमॅटो नाही खाल्ला म्हणून मरायला लागलाय, असा सवाल त्यांनी केला.
दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…
सिलिंडवर अनुदानाची मागणी करा
टोमॅटो खाऊ नका त्याऐवजी दुसरी भाजी खा. मिरचेची भाजी करा स्वस्त आहे. हिरव्या मिरच्यांची भाजी विदर्भात करतात मिरच्यांचं माडगं करा आणि पित बसा. टोमॅटो टोमॅटो करताय.. काय ज्यूस पिऊन अंघोळ करताय टोमॅटोचं ? गॅस सिलिंडर महाग झालाय त्याला अनुदान द्यायला पाहिजे ही मागणी करायला पाहिजे सरकारकडे. पण, टोमॅटोचे दर वाढले म्हणून कुणी ओरड करत असेल तर दोन तीन महिने कळ काढा, असे खोत म्हणाले.