Download App

‘ओरिजिनल गद्दारांना फोडणाऱ्यांनीच त्यांना किंमत दाखवली’; आदित्य ठाकरेंचा घणाघात!

Aditya Thackeray attacks on Shinde Group : राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटाला घेरले आहे. जे ओरिजिनल गद्दार आहेत. ज्यांनी मागील वर्षी गद्दारी केली. त्यांना काय किंमत मिळाली हे ज्यांनी (भाजप) त्यांना फोडलं, अमिषं दिली त्यांनीच दाखवून दिलं आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली.

महाविकास आघाडीतील विधीमंडळ नेत्यांच्या बैठकीनंतर ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, आगामी अधिवेशनात राज्यातील नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जनतेच्या याच प्रश्नांसाठी आम्ही लढत राहणार आहोत.

ठाकरे गट अन् सुळे गट आगामी निवडणुका पंजाच्या निशाणीवर लढवणार; नितेश राणेंचा टोला

ते फक्त खुर्ची वाचविण्यात मग्न

एका घटनाबाह्य मुख्यमंत्र्याने स्वतःच्या स्वार्थासाठी राज्याला कुठे नेऊन ठेवलंय हे आपण पाहतोय. ते पक्ष फोडण्यात, स्वतःची खुर्ची वाचविण्यात मग्न झाले आहेत. त्यांना त्यांच्या खुर्चीचे टेन्शन जास्त आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी पक्ष फोडण्याचे काम सरकारकडूनच केले जात आहे. या प्रवृत्तीविरोधात आम्ही लढत राहणार आहोत, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

एक वर्षापूर्वी ज्यांनी गद्दारी केली. स्वतःची इज्जत काय हे दाखवले त्यावेळी. त्यांना आज काय किंमत दिली आहे. चार दिवसांपूर्वी शपथविधी झाला त्यानंतर पुढे काय याचा आराखडा सरकारने दिला नाही. पण, जे ओरिजिनल गद्दार आहेत त्यांच्याबद्दल मला खूप हसू येते. त्यांची किंमत काय आहे हे ज्यांनी त्यांना फोडलं ज्यांनी त्यांना अमिषं दाखविली यांनीच दाखवून दिली, अशी टीका ठाकरे यांनी केली.

राष्ट्रवादी भवन आमचचं, स्वत:हून ताब्यात द्या नाहीतर.., दीपक मानकरांचा आक्रमक पवित्रा

त्यावर उत्तर देणं ठाकरेंनी टाळलं 

पावसाळी अधिवेशनाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघााडीचा विरोधी पक्षनेता कोण असेल असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. मात्र, या प्रश्नाचे उत्तर न देताच आदित्य ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष करत शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करण्यास सुरुवात केली.

Tags

follow us