Uday Samant : महायुतीमधील (Mahayuti) दोन मंत्र्यांमध्येच जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर जोरदार टीका केली. हर्णे मधील दगडफेक प्रकरणावरून त्यांनी कदमांवर निशाणा साधला. ते फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत, असं विधान करत राणेंनी कदमांवर टीका केली. त्यावर आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना भाष्य केलं.
माफी मागण्यासाठी शब्द नाही अन्…, विधानसभेत ओमर अब्दुल्ला भावुक
उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सामंत यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. नितेश राणे यांच्या वक्तव्याविषयी बोलताना ते म्हणाले की, माझी नितेशजींना हात जोडून विनंती आहे. दापोलीमधून योगेशजी चांगलं काम करतात. ते स्वत: राज्यमंत्री आहेत. गृहविभाग त्यांच्याकडे आहे. स्वत:च्या मतदारसंघात ते वाद कशाला ठेवतील? काही मंडळी विघ्न संतुष्ट असतात. अशी लोक स्वत:च्या लोकप्रतिनिधीबद्दल आपल्या नेत्यांच्या कानात काहीतरी वेगळं सांगत असतात. माझी विनंती आहे, नितेश राणेंनी खात्री करूनच वक्तव्ये करावी, असा सल्ला सामंत यांनी दिला.
योगेश कदम राज्यमंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत. ते डिस्टर्ब होणार नाहीत, याची दक्षता आपण घेतली पाहिजे, असंही सामंत म्हणाले.
पाकिस्तानचा झेंडा वाचवला, नालासोपारा पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या
तसेच प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. नितेशजींना भाजप वाढवू नये, अशी आमची भूमिका नाही. पंरतु, महायुतीत वाद होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असंही सामंत म्हणाले.
राणे काय म्हणाले होते?
दापोली येथील एका सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले होते की, इथून पुढे तुमच्याकडे जर कोणी दगड फेकला तर त्या प्रत्येक दगडाचा हिशोब चुकता होईल, हा विश्वास मी तुम्हाला देतो…. दगडफेकीच्या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव एफआयआरमध्ये नाही ही गंभीर बाब आहे. हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तु्म्ही निश्चिंत राहा. त्यांना कोण वाचवणारे असतील ते मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत, हे संबंधित खात्यातील लोकांनी लक्षात घ्यावं, असं म्हणत राणेंनी अप्रत्यक्षपणे योगेश कदम थेट इशारा दिला होता.
कदम काय म्हणाले?
योगेश कदम यांनीही राणेंवर प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असं ते म्हणाले.